शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

अजिंक्यताºयासाठी मावळ्यांची ढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:11 AM

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक मावळे पुढे सरसावले असून, वणवे रोखण्यासाठी ते गस्त घालणार आहेत.अलीकडे वणवे लावण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढत असून, हे ...

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक मावळे पुढे सरसावले असून, वणवे रोखण्यासाठी ते गस्त घालणार आहेत.अलीकडे वणवे लावण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढत असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी साताºयातील काही युवक एकवटले आहेत. केवळ चर्चा करून चालणार नाही तर आपण स्वत:हून पुढाकार घेऊन वणवे लावणाºया विघ्नसंतोषींना पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अजिंक्यारा, यवतेश्वर आणि कास पठारावर दिवसांतून दोनवेळा गस्त घालण्याचाही निर्धार युवकांनी केला आहे.वणव्यामुळे वनसंपदेबरोबरच जीवसृष्टीही नष्ट होऊ लागली आहे. काही वर्षांपासून अजिंक्यताºयावर विविध सामाजिक संघटनांकडून वृक्षारोपण करण्यात येत आहे. ही झाडे आताशी कुठे उमलू लागली आहेत. असे असताना विघ्नसंतोषींकडून वणवे लावले जात आहेत. या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीची हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींबरोबरच साताºयातील काही युवक अस्वस्थ झाले आहेत.आता आपण गप्प बसायचे नाही, असा निर्धार करून संदीप मदने, बाळासाहेब पवार, राजू माने, विजय बेडेकर, लक्ष्मण जाधव, धीरज सोनवणे आणि राजू साळुंखे यांनी वणवे विझविण्यासाठी आणि संबंधितांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण वणवे लावणाºया युवकांवर कारवाई करू शकत नसलो तरी त्यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात तरी देऊ शकतो. त्याहीपेक्षा वणवे लागणारच नाहीत, हीच खबरदारी आम्ही घेऊ, असाहीत्यांनी निर्धार केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे युवक एकवटले आहेत.विशेषत: दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास वणवे लावले जातात. नेमक्या याचवेळी वेगवेगळे गट करून हे युवक गस्त घालणार आहेत. वणवा बचाव मोहीम हाती घेताना पदरमोड करून ही मोहीम यशस्वी करण्याचा मानसही युवकांनी व्यक्त केला आहे.अनेक युवकांचे तपासले खिसेअजिंक्यताºयावर युवकांची नेहमीच ये-जा सुरू असते. अनेकांकडून किल्ल्यावर मद्यपान केले जाते. किल्ल्यावर अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे पडल्याचे आजही दिसून येत. या किल्यावर भर दुपारी येणाºया युवकांचे या टीमने शुक्रवारी दुपारी खिसे तपासले. काडीपेटी आणि लायटर आहेत का? हेही पाहिले. एवढेच नव्हे तर अजिंक्यताºयावर केवळ फिरू नये. येणाºया नागरिकांकडे तुम्ही वणवे लावू नका, असे सांगा, असेही हे युवक आवर्जून सांगत होते.