शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

माऊली... माऊली.... 'हिरा'ऐवजी 'राजा'ने पूर्ण केले पहिले उभे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 18:49 IST

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. या नयनरम्य सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी

तरडगाव (सातारा): श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी पार पडले. दरवर्षी रिंगणात धावणाऱ्या माऊलींच्या हिरा या अश्वाचे पुण्यात निधन झाल्याने राजा या अश्वाने हे रिंगण पूर्ण केले. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील दीड दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावकडे एक दिवसाच्या मुक्कामासाठी शनिवारी सकाळी मार्गस्थ झाला. तालुक्याच्या सीमेवर कापडगावजवळील सरदेचा ओढा येथे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. 

पहिल्या रिंगणाचे वेध लागलेला हा सोहळा भक्तिमय वातावरणात मजल दरमजल करीत पुढे सरकत होता. दुपारी माउलींचा मानाचा नगारखाना रिंगणस्थळी आला, पाठिमागून अश्व आले. त्यानंतर मंदिरासमोर पालखी आल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले. यावेळी परिसरातील भाविक, नागरिकांनी वर्षातून एकदाच दिसणारा नयनरम्य रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सोहळा पाहता यावा म्हणून भाविक मोठ्या वाहनांवर उभे राहिले होते. धावत येणाऱ्या माऊलींच्या त्या अश्वांना पाहून स्पर्श करण्यासाठी असंख्य नजरा आतूर झाल्या होत्या. उत्साही वातावरणातच सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावले. या दोन अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत रथाकडे वळून त्यातील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले. यावेळी अश्वांच्या टापाची माती ललाटी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. या सोहळ्यात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

दरम्यान, या नयनरम्य सोहळ्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वारकऱ्यांनी फेर धरीत पारंपरिक खेळ खेळीत अनेकांनी फुगड्या खेळल्या. त्यानंतर हाती भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन व मुखी ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे बोल घेत सोहळ्यातील सहभागी वैष्णव विठ्ठल भेटीच्या ओढीने तरडगावमधील एक दिवसाच्या मुक्कामाकडे वळाले. 

'माऊली माऊली’चा जयघोष'टाळमृदंगाचा गजर, रोखलेला श्वास, ताणलेल्या नजरा अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात वैष्णवांचा मेळ्यातून माऊलींच्या व स्वाराच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण करताच सारा आसमंत दुमदुमला. डोळ्यांचे पारणे फेडणारा चांदोबाचा लिंब येथील सोहळा पाहून वारकऱ्यांनी माऊली... माऊली... असा एकच जयघोष केला

पाहा नयनरम्य 'रिंगणसोहळा'

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरSatara areaसातारा परिसर