शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सातारा शहरातील बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:32 IST

सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले. सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती.

ठळक मुद्देमार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारमहालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी केले व्रताचे उद्यापनशाळेच्या आधी व्यवसायाचे धडे

सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले.सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती. भल्या सकाळीच बाजारात पाच फळे, हार, फुले यासह पुस्तके घेऊन बसणाऱ्या विक्रेत्यांनी अवघा राजपथ झाकोळून गेला होता. मोती चौक ते गोलबाग या परिसरात विक्रेत्यांची मोठी गर्दी होती.

याबरोबरच राजवाडा, मंगळवार तळे रस्त्यावरही जागा मिळेल तिथे बसून व्यापाऱ्यांनी पूजेसाठी आवश्यक वस्तूंची विक्री केली. घरातील कामे आवरून पूजेचे साहित्य आणण्यासाठी आलेल्या महिलांचा वेळ वाचावा म्हणून काही व्यावसायिकांनी पाच फळे, हार, फुले आणि पुस्तकं असं सगळं एकत्रच विक्रीसाठी ठेवले होते. याची किंमत अधिकची असली तरी पायपीट न करता एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्यामुळे महिलांनी या खरेदीला पसंती दिली.शाळेच्या आधी व्यवसायाचे धडेमार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणून ग्राहकांचा ओढा वाढता असणार याचा अंदाज घेऊन यावेळी व्यावसायिकांनी आपल्या घरातील माणसांनाही मदतीसाठी सोबत घेतले होते. स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकाला इच्छित माल देण्याचे काम या घरातील चिमुरड्यांचे होते. तर दिलेल्या मालाचा व्यवहार घरातील मोठे करीत होते. विशेष म्हणजे शाळेच्या गणवेशात उभे राहून ही मुलं घरातील व्यवसायात मदत करत होते. सकाळी अकरानंतर मात्र ही मुलं शाळेत गेली होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार