शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणूक: पत्नीचा अर्ज बाद, पतीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 22:02 IST

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.

खंडाळा : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत प्रवर्गातून स्वाती आदेश जमदाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, अर्ज छाननीत निर्धारित क्षेत्र नावावर नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. याच्या निषेधार्थ स्वाती जमदाडे यांचे पती शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खंडाळा तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी सहायक निबंधक कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व अधिसूचनेमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे, असे सांगत आदेश जमदाडे यांनी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडून गेला. यावेळी त्या ठिकाणी सहायक निबंधक देविदास मिसाळ, ज्ञानेश्वर चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे खंडाळा तहसीलदार कार्यालयात व सहायक निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे.

निवडणुकीत १२ अर्ज अवैध -बाजार समितीच्या १८ जागांसाठी एकूण १०० उमेदवारी अर्ज भरले गेले होते. यापैकी १२ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून ८८ अर्ज पात्र धरण्यात आले आहेत. यामध्ये सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारणच्या सात जागांसाठी ४४ ,महिला दोन जागांसाठी ७, इतर मागास प्रवर्गच्या एका जागेसाठी ३, विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी ४ असे उमेदवारी अर्ज वैध झाले असून, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण दोन जागांसाठी १४ , अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ४, आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी १ अर्ज पात्र ठरले. व्यापारी आडते मतदार संघातून दोन जागांसाठी ६ अर्ज वैध झाले असून हमाल व तोलारी मतदार संघातून एका जागेसाठी ५ अर्ज वैध झाले आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर