मनरेगातील या कामाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र काढून अतितात्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्याला जवळपास ५ महिने पूर्ण होऊनही अद्याप चौकशीचा अहवाल मिळाला नसल्याने व पंचायत समिती माणचे गटविकास अधिकारी यांच्याकडून गैरव्यवहाराच्या चौकशीत दिरंगाई आणि पक्षपातीपणा होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते रोहित दादासाहेब पोळ आणि चंद्रकांत नाथाजी पोळ हे १ एप्रिल रोजी मार्डी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणासाठी बसले होते.
याची गंभीर दखल घेत त्याच दिवशी संध्याकाळी माण पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते यांना त्यांच्या मागणीनुसार सर्व कामांची तपासणी करून २० एप्रिल २०२१ पर्यंत राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याद्वारे लेखी अहवाल देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.