शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द; सातारा जिल्ह्यात तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:59 IST

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झालेल्या आहेत.

ठळक मुद्देमराठा आरक्षण रद्द; सातारा जिल्ह्यात तीव्र नाराजी मराठा क्रांती संघटनेकडून निषेध; मोर्चाची तिसरी लाट आणण्याचा इशारा

सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झालेल्या आहेत.येथील पोवईनाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. हे कार्यकर्ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले. याबद्दल आम्ही राज्य सरकारचा निषेध करतो. राज्य सरकारने योग्य बाजू मांडलेली नाही. सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. कोविडमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला असता मात्र महामारीमुळे तो उतरु शकत नाही.

मराठा समाज कायदा, सुव्यवस्था पाळणार आहे. जोपर्यंत कोविडचा कार्यकाल आहे तोपर्यंत शांत बसायचे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी रस्त्यावर उतरत नाही म्हणून राज्य सरकारे सुटकेचा नि:श्वास घेऊ नये. आता बास झाले मराठा समाजाची तिसरी लाट येईल. समाजाचा उद्रेक काही दिवसांतच पाहायला मिळेल.कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मराठा समाजाचे रौद्ररुप राज्य सरकारला दिसेल. पहिल्यासारखे राजकारण राहिले नाही. गैरसमज कोण काय करते स्वत:चे हात कसे काढून घेते, हे समाजाला माहिती आहेत. अख्या महाराष्ट्रातील एक आमदार, एक खासदार सोडले तरी मराठ्यांच्या बाजूने कोणी बोलले नाही. जाणूनबजून दुर्लक्ष केले आहे. राज्याची मिटिंग झाल्यानंतर निर्णय घेऊ. जनतेला, पोलिसांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे मराठा समाज शांत राहिल. मात्र कोरोनाची लाट ओसरताच जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसर