शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
4
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
5
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
6
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
7
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
8
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
9
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
10
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
11
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
12
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
13
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
14
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
15
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
16
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
17
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
18
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
19
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
20
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर

Maratha Kranti Morcha : सातारा : मुंबईच्या दंगलीत पाटणच्या युवकाचा मृत्यू, आंदोलक आणखी भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:40 PM

नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात झालेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोलीच्या एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने आंदोलक आणखी भडकले. शुक्रवारी सकाळी संबंधित युवकाचा मृतदेह गावी आणण्यात येत असताना चाफळमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करीत रुग्णवाहिका अडवून धरली. दुपारपर्यंत जमाव आक्रमक भूमिकेत होता.

ठळक मुद्देमुंबईच्या दंगलीत पाटणच्या युवकाचा मृत्यू, आंदोलक आणखी भडकले चाफळमध्ये रुग्णवाहिका अडवली; बसस्थानकात जाळपोळ

चाफळ (सातारा) : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात झालेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोलीच्या एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने आंदोलक आणखी भडकले. शुक्रवारी सकाळी संबंधित युवकाचा मृतदेह गावी आणण्यात येत असताना चाफळमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करीत रुग्णवाहिका अडवून धरली. दुपारपर्यंत जमाव आक्रमक भूमिकेत होता.रोहण दिलीप तोडकर (वय १९, रा. खोणोली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खोणोली येथील रोहण तोडकर हा युवक परिसरातीलच काही युवकांसमवेत कोपरखैरणेच्या एका खासगी कंपनीमध्ये नोकरीस होता.

संबंधित युवकांसोबतच तो कोपरखैरणेमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी राज्यभर मराठा क्रांती आंदोलन सुरू असताना रोहणही कोपरखैरणे भागात निघालेल्या आंदोलनात सहभागी झाला. त्यानंतर या भागात जाळपोळ, तोडफोड झाली. पोलिसांनीही बेसुमार लाठीमार केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असताना रोहण रात्री उशिरापर्यंत रुमवर परत आला नाही. त्यामुळे त्याच्यासमवेत राहणाऱ्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच घटनेची माहिती नातेवाइकांनाही दिली.रोहणचे नातेवाईक तसेच मित्र गुरुवारी सकाळी तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. रोहण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना जे. जे. रुग्णालयात जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार सर्वजण रुग्णालयात गेले. त्यावेळी त्याठिकाणी शवगृहात रोहणचा मृतदेह बेवारस आढळून आला.

दंगलीवेळी झालेल्या लाठीमारात रोहण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी रोहणच्या नातेवाइकांना सांगितले आहे. मात्र, आंदोलनावेळी एका जमावाने तलवारीने वार करून तसेच मारहाण करून रोहणचा खून केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आंदोलक आणखी भडकले आहेत.रोहणचा मृतदेह शुक्रवारी सकाळी घेऊन एका रुग्णवाहिका त्याच्या मूळगावी खोणोली येथे येत होती. आंदोलकांनी पाटण तालुक्यातील चाफळ येथे संबंधित रुग्णवाहिका अडवली. काही युवकांनी नजीकची झाडे तोडून रस्त्यावर टाकली. तसेच चाफळ बसस्थानकात टायरही पेटविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला.

आमदार शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पोवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी त्याठिकाणी दाखल झाले. रोहणच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, तरीही आंदोलक आक्रमक भूमिकेत होते. दुपारी १२ वाजेपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका आंदोलकांनी रस्त्यातच अडवून धरली होती. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर