शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha साताऱ्यात पोलिसांचा हवेत गोळीबार, आंदोलनाला हिंसक वळण; पोलीस व्हॅन फोडली; तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:25 IST

मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांचा मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले.

ठळक मुद्देसाताऱ्यात पोलिसांचा हवेत गोळीबार, आंदोलनाला हिंसक वळणपोलीस व्हॅन फोडली; तीन पोलीस जखमी

सातारा : मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांचा मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले.मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी दुपारी मोर्चा काढल्यानंतर आंदोलक आपापल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर अचानक महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू झाली. काही संतप्त जमावाने चक्क पोलीस व्हॅनलाच लक्ष्य केले. दगडफेकीत पोलीस व्हॅनचे आणि एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले.

जमाव आणखीनच हिंसक बनत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जमाव विखुरला होता. पोलिसांनी पाठलाग करून काही जणांना ताब्यात घेतले. अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करावा लागला.महामार्गालगत असणाऱ्या वाहनांच्या शोरूमवरही दगडफेक केली. आंदोलक हिंसक बनत चालल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. महामार्गावर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

कोल्हापूर आणि पुणे बाजूकडून ये-जा करणारी वाहने काही काळासाठी जागच्या जागी थांबविण्यात आली आहेत. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर