खटाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावला. घरातच राहा, बाहेर गर्दी करू नका, असे सांगूनही काहीजण फिरत आहेत. अशांवर पोलिसांची करडी नजर आहे. विनाकारण फिरणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, तसेच वाहनातून प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत गावात कडक बंदोबस्त आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करत असताना, दंडात्मक रक्कमही वसूल केली जात आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने खटावमध्ये तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अशा नियमाच्या उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
फोटो नम्रता भोसले यांनी पाठविला आहे.
खटाव येथे विनाकारण फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. (छाया : नम्रता भोसले)