शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

अनेक पक्षांसमोर उमेदवारीचा पेच !

By admin | Updated: December 31, 2016 22:02 IST

पिंपोडे बुद्रुक गटात मोर्चेबांधणी सुरू : उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची नेत्यांकडे धाव

संजय कदम -- वाठार स्टेशन नगरपालिका निवडणुकीनंतर लक्ष वेधलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका फेब्रुवारी महिन्यात निश्चित होतील, अशी शक्यता वर्तवली जात असल्यामुळे तालुक्यातील सर्वच गटांत आता राजकीय मोर्चेबांधणीस वेग आला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक गट सर्वसाधारण गट हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित राहिल्याने या गटात उमेदवारीसाठी सर्वाधिक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षांनाही आता पेच पडला आहे.विस्ताराने मोठ्या असलेल्या पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात देऊर, पिंपोडे बुद्रुक अंबवडे (सं) वाघोली, नांदवळ, सोळशी, करंजखोप, सोनके या मोठ्या गावांचा समावेश झाला असल्याने या गावातील कोणत्या उमेदवारास संधी मिळणार हा प्रश्नच आहे. हा गट फलटण विधानसभा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असल्याने राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचारातूनही उमेदवारी निश्चित होणार असल्याने आता इच्छुकांनी नेत्यांकडे धाव घेतली आहे.पिंपोडे बुद्रुक गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य सतीश धुमाळ हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असून या गटात सतीश धुमाळ यांनी केलेल्या सर्वसमावेशक कामाचा लाभ त्यांना राष्ट्रवादीची पुन्हा उमेदवारी मिळण्यास होऊ शकेल, अशी चर्चा आहे. तर आमदार शशिकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नीलेश जगदाळे हे युवकांचे आशास्थान म्हणून परिचित आहेत प्रत्येक गावाशी त्यांचा असलेला जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यास त्यांनी केलेली मदत ही त्यांच्या उमेदवारीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे निष्ठावंत समजले जाणारे सुधील धुमाळ यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खा. शरद पवार यांच्या नांदवळ गावातील शिवाजीराव पवार यांनीही राष्ट्रवादीतून उमेदवारी साठी पक्षपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष मंगेश धुमाळ हे राष्ट्रवादीमधून इच्छुक असून, मंगेश धुमाळ यांचा या मतदार संघातील जनसंपर्क आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निकटवर्तीय व छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुयोग लेंभे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. सुयोग लेंभे यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांच्या उमेदवारीस त्यांचे वडील रामभाऊ लेंभे यांचा जनसंपर्क महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय बाळासाहेब भोईटे यांचेही नाव चर्चेत असून कॉँग्रेसमधून अ‍ॅड. मेघराज भोईटे यांच्या नावाची चर्चा आहे.किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचे समर्थक म्हणून भोईटे यांची या गटात ओळख आहे. तर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी पहिल्यांदाच या गटात भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. भापजचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ हे ‘जलयुक्त’चे जादूगार म्हणून या भागात सर्वपरिचित आहेत. वसना नदीचे पुनर्भरण करीत या नदीवर कोट्यवधी रुपयांचे काम जलयुक्त शिवार मधून पूर्र्ण झाल्यामुळे पाणीदार नेतृत्व म्हणून दीपक पिसाळ यांचे नाव भाजपमधून आघाडीवर आहे. जलयुक्त शिवारचे नेते मनोज अनपट हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने मनोज अनपट यांचेही नाव भाजपमधून घेतले जात आहे. तर शिवसेनेतून संतोष सोळस्कर उमेदवारी लढवणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनही माजी जिल्हा उपप्रमुख ज्ञानदेव कदम यांचे नाव चर्चेत आहे.बदललेल्या गट विस्तारामुळे संभ्रमावस्था..गटात पडलेले खुले आरक्षण आणि बदललेला गट विस्तार यामुळे या गटातून उमेदवारी निश्चित करणे ही नेत्यांसाठी आव्हानात्मक राहणार आहे. पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात सध्याच्या वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम हे इच्छुक असून, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु बदललेला मतदार संघ त्यांना कितपत साथ देईल, हे काळच ठरवेल.गणातही इच्छुकांची भाऊगर्दीजिल्हा परिषद गटा प्रमाणेच पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे गटाप्रमाणेच गणातही इछुकांची गर्दी होणार आहे. राष्ट्रवादीतून जीवन सोळस्कर, जितेंद्र जगताप, शिवाजी पवार विद्यमान पंचायत समिती सदस्य अशोकराव लेंभे, भूषण पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजप व मित्रपक्षातून सूर्यकांत निकम, संजीव साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे.