शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा नियम लोकांसाठी, शासकीय वाहनांसाठी काय ?

By दीपक देशमुख | Updated: March 20, 2025 17:32 IST

शासनाने स्वत:पासून सुरुवात करावी : सर्वसामान्यांना फटका

दीपक देशमुखसातारा : विविध करांमुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांसमोर शासनाने एचएसआरपी नंबर प्लेटचा खर्च वाढून ठेवला आहेच, अन्यथा दंड निश्चित आहे. एकीकडे सर्वसामान्यांना आर्थिक परिस्थितीमुळे यास उशीर झाल्यास गय न करणाऱ्या शासनाच्या अनेक विभागांमध्ये अद्यापही नवी नंबर प्लेट अद्यापही बसवलेली नाही. मग त्यांच्यासाठी नियम नाहीत काय, असा सवाल करण्यात येत असून लोकांना सक्ती करण्यापूर्वी अगोदर शासनाने आपल्या सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवण्याची गरज आहे.

सरकारकडून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. ही नंबर प्लेट नसली की वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जिल्ह्यात शासनाच्या अवघ्या काहीच शासकीय वाहनांनाच ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावली आहे. इतर वाहने विना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून धावत आहेत. महसूल, जिल्हा परिषद अन् पोलिसांच्या वाहनांचाही यात समावेश आहे. त्यामुळे शासनच नियम धाब्यावर बसवित असल्याचे दिसत आहे.अनेक गोरगरीब सर्वसामान्यांच्याकडून अशा कामांना उशीर होऊ शकतो. मात्र, त्यांच्याकडून गुन्हेगारांसारखा दंड वसूल करण्यात येतो. त्याचवेळी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या यांच्या शासकीय तसेच खासगी वाहनांवर कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

लाखो वाहने रस्त्यावर, मुदत अपुरी केंद्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांनादेखील हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मागे राहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनावर कारवाई केली जाणार आहे; परंतु २०१९ पूर्वीची लाखो वाहने रस्त्यावर धावत असून, यासाठी पुरेशी मुदत देऊन तोपर्यंत दंडात्मक कारवाई स्थगित करण्याची गरज आहे.

३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने हा नियम लागू केल्यानंतर १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहन वितरक हे एचएसआरपी नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देत आहेत. परंतु, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देत ३० एप्रिलनंतर एचएसआरपी नंबर प्लेटशिवाय वाहन आढळल्यास १ हजार दंड आणि शिक्षेचीदेखील तरतूद आहे.

आरटीओ  काढणार परिपत्रक सातारा आरटीओ कार्यालयाशी याबाबत संपर्क साधला असता याबाबत सर्व शासकीय विभागांना लवकरात लवकर शासकीय वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याबाबत परिपत्रक काढणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीस