दहिवडी : आई, बहिणीला त्रास देणाऱ्या आजीचा काटा कसा काढावा म्हणून ‘तो’ येडेनिपाणीत जाऊन मांत्रिकाला भेटला. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार त्यानं आजीचा खून केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन मांत्रिकाला भेटला. पोलिसांना समजेल का म्हणून मांत्रिकानंही कौल लावून बिनधास्त जाण्यास सांगितलं, पण पोलिसांची तांत्रिक माहिती वरचढ ठरली अन् अल्पवयीन नातू जाळ्यात सापडला. त्याच्या माहितीरून मांत्रिकालाही बेड्या ठोकल्या. पुजारी आनंदा तांदळे (रा. येडेनिपाणी) असे दहिवडी पोलिसांनी अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, माण तालुक्यातील मार्डी येथे आईला आणि बहिणीचा आजी छळ करून उपाशी ठेवत होती. याचा राग अल्पवयीन नातवाला होता. त्यातून त्याने आजीच्या जाचातून आई, बहिणीची सुटका करण्याचा विचार करत होता. एके दिवशी तो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील देवर्षि पुजारी आनंदा दत्तात्रय तांदळे यांच्याकडे गेला. त्याने मांत्रिकाला ‘आजीचा खून करायचा आहे, काय करावे लागेल?’ म्हणून विचारले.यावर पुजाराने सांगितले की, ‘खून करताना एकट्याने जायचे. कोणालाही बरोबर घ्यायचे नाही. नाहीतर पोलिसांना समजते.’ पुजाराने सांगितल्याप्रमाणे नातू याने मध्यरात्री आजीची म्हैस सोडून दिली. म्हैस शोधण्यासाठी आजी घरामागे आली असताना त्याने आजीच्या डोक्यात बॅट मारून खाली पाडले. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला. पोलिस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.हालचालीवर लक्ष ठेवून नातू ताब्यातखुनानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्निल मोटे पुजाऱ्याकडे गेला आणि सगळा प्रकार सांगितला. ‘देवाला कौल लावा. पोलिसांना माझा संशय येईल का?’ म्हणून विचारले. त्यावेळी पुजाराने कौल लावला आणि सांगितले की, ‘आता उजवा कौल दिला आहे. तू केलेला प्रकार पोलिसांना समजणार नाही. तू आता बिनधास्त राहा.’ परंतु दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासल्या. हालचाली ओळखून अल्पवयीन नातवाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून खुनाची कबुली दिली. त्यामध्ये पुजारी आनंदा तांदळे याला अटक केली.
दोन दिवसांत बेड्याया खून प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासून व इतर माहितीच्या आधारे घटना घडल्यापासून दोन दिवसांच्या आत आरोपीना अटक करून आदर्श कामगिरी केली आहे.