शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

By प्रमोद सुकरे | Updated: November 18, 2023 17:27 IST

भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलं

कराड : मराठा आरक्षणाचा प्रश्न ७० टक्के मार्गी लागला आहे. ३० टक्के बाकी आहे. अशावेळी आज आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी पाठीशी उभे राहा. नाही राहिलात तर ही लेकरं आयुष्यभर तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत', असा खणखणीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी कराडात सर्वपक्षीय मराठा नेत्यांना जाहीर सभेतून दिला. जरांगे-पाटील म्हणाले, आज मराठ्यांच्या लेकरांवर वेळ आली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा. मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही, पण पाठीशी राहिला नाहीत तर हाच मराठा आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही. दरम्यान ग्रामीण भागातील मराठा आणि ओबीसी समाज आजही एकमेकांच्या सुख-दुःखात उभा राहतो. मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जायचं नाही. कुणी कितीही उचकवलं तरी उचकू नका, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना केले.भुजबळांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलंछगन भुजबळ यांचा समाचार घेताना जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ म्हणून व्यक्तीला आपला विरोध नाही. त्यांच्या विचारांना विरोध आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे त्यांना किंमत द्यायची नाही. त्यांना सुद्धा मराठ्यांनीच मोठं केलंय हे लक्षात घ्या. मराठा आरक्षणाच्या विरोधातील त्यांचे सगळे डाव हाणून पाडा.

सध्या जशास तसं उत्तर नाहीराज्यात, जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात साखळी उपोषण सुरू नाही, असं एकही गाव राहिलं नाही पाहिजे. ७० वर्ष न मिळालेलं आरक्षण आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करून निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. हे शांततेच ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद देशात कोणातच नाही. त्यामुळे सध्या जशास तसं उत्तर द्यायचं नाही. त्यांना जरा दमू द्या. काय-काय करतात बघा, असा सल्लाही जरांगे-पाटील यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण