शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जल्लोषी स्वागत; क्रेनने घातला हार

By नितीन काळेल | Updated: November 18, 2023 14:31 IST

सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत, आयोजकांकडून विश्वास व्यक्त

सातारा : मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा दाैरा सुरू असून शनिवारी साताऱ्यातील सभेपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करत क्रेनद्वारे मोठा हार घालण्यात आला. तर याभेटीदरम्यान, आयोजकांनी आरक्षणासाठी सातारचे दोन्ही राजे आपल्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते. त्यावेळी राज्य शासनाने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दाैरा सुरू केला आहे.शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. तसेच सातारचे दोन्ही राजे आरक्षणाबाबत आपल्यासोबत असल्याचेही सांगितले. यावेळी समाजबांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी... एक मराठा, लाख मराठा.. अशी जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळ भेटीनंतर मनोज जरांगे-पाटील हे पोवई नाक्यावर गेले. याठिकाणी समाजबांधवांनी फुलांच्या वर्षावात जरांगे-पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर ते सभास्थळाकडे रवाना झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण