शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनीषा काळेंनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, वडूजच्या नगरसेवकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:47 IST

नगराध्यक्षपदाचा कालावधी संपण्याची चाहुल लागताच काळे यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी

वडूज : येथील नगराध्यक्षा मनीषा काळे यांनी सर्वप्रथम नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, अशी मागणी वडूज विकास आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे. नगराध्यक्षपदाचा कालावधी संपण्याची चाहुल लागताच काळे यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली आहे.वडूज विकास आघाडीच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे संख्या बलाबल करत दहा महिन्यांपूर्वी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन केली. निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५, भाजपचे ६, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी १, अपक्ष ४ असे नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी, वंचित आघाडी व अपक्षांनी एकत्र येऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमोर वडूज विकास आघाडीची अधिकृत नोंदणीही केली होती. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मनीषा काळे यांना अपक्ष असूनही पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशही केला होता. त्यांच्या पदाचा दहा महिन्याचा कालावधी संपण्याची चाहूल लागताच त्यांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला राजकीय भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र बदलती भूमिका घेताना मनीषा काळे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अन् कोणत्याही पक्षात जावे असे या पत्रकात म्हटले आहे.पत्रकावर उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेविका आरती काळे, राधिका गोडसे, शोभा बडेकर, शोभा वायदंडे, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे आदींच्या सह्या आहेत.

सत्ता स्थापनेपासून भरीव विकासकामात अडथळा निर्माण करणे, पाणी योजनेला खीळ घालणे, टेंडर काढू न देणे, खासदार-आमदारांनी सुचविलेल्या कामांचे ठराव करून घ्यायचे नाही, ही नगर विकास आघाडीची जाचक भूमिका शहराच्या सर्वांगीण विकासाला आड येत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. - मनीषा काळे, नगराध्यक्षा वडूज

टॅग्स :Satara areaसातारा परिसर