शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बाजार समितीचा जाहीरनामा; भ्रष्ट कारभाराचा पंचनामा, ‘स्वाभिमानी’चा इशारा 

By नितीन काळेल | Updated: April 27, 2023 12:42 IST

शेतकऱ्यांचे भविष्य बंडलबाजांनी उध्दवस्त केले

सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीरनामा प्रसिध्द करुन सत्ताधाऱ्यांचा कारभार उघडा केला आहे. आता मागील ३० वर्षांच्या कामाचा पंचनामा करु. कारण, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठीच ही एकजूट झाली आहे, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे अजिंक्यतारा पॅनेल आणि विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलमध्ये सरळ आणि दुरंगी सामना होत आहे. या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जाहीरनामा प्रसिध्द केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जून सकुंडे, विकास जाधव, माजी नगरसेवक राम हादगे, काँग्रेसच्या सुषमा राजेघोरपडे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले समऱ्थक आणि शेतकरी उपस्थित होते.जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष शेळके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘बाजार समिती निवडणुकीचा हा जाहीरनामा नसून त्यांच्या ३० वर्षांतील कामाचा पंचनामा मांडला आहे. शेतकऱ्यांचे भविष्य बंडलबाजांनी उध्दवस्त केले. अनेक पापाच्या भानगडी केल्या आहेत.अजिंक्यतारा साखर कारखान्याने खासगी संस्थेला पाच एकर जमीन दिली. कारण, त्यांना जाब विचारणारेच कोण नाही. त्यामुळे तेही उत्तर द्यायला बांधील नाहीत. सत्ताधाऱ्यांनी काही भ्रष्ट केले असेल त्याची आता पै न पै वसूल केली जाईल. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठीच एकजूट झाली आहे. कारण, दडपशाहीचे राजकारण संपले असून आता उठाव आणि क्रांती झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाMarketबाजार