शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीची ‘सुवर्ण’ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:03 IST

प्रत्येकाला आपलं मूल, भाच्चा, भाजी, पुतण्या छान गुटगुटीत सगळ्यांसारखं हसणारं, खेळणारं असावं असं वाटतं; पण तेच मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं विशेष असेल तर कोणाला कल्पनाही करवत नाही; पण अनेकांना हे माहितीच नसतं की ही मुलंच जगावेगळी असतात.

ठळक मुद्देपॉवरलिफ्टिंगमध्ये दबदबा । बेंचप्रेसमध्ये सुवर्ण तर स्काँट, डेडलिफ्ट व कम्बाइन्ड प्रकारात तीन कांस्यपदकांची मानकरी

जगदीश कोष्टी ।सातारा : प्रत्येकाला आपलं मूल, भाच्चा, भाजी, पुतण्या छान गुटगुटीत सगळ्यांसारखं हसणारं, खेळणारं असावं असं वाटतं; पण तेच मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं विशेष असेल तर कोणाला कल्पनाही करवत नाही; पण अनेकांना हे माहितीच नसतं की ही मुलंच जगावेगळी असतात. त्यांना त्यांच्या स्वभावानुसार क्षेत्र दिलं तर ‘कुछ भी कर सकते हैं,’ हे करून दाखविलं मानली शेळके हिने. विशेष मुलांसाठी घेतल्या जात असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत मनाली शेळकेने सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई केली.

साताऱ्यात जाधव कुटुंबात २९ मार्च १९९९ रोजी मनालीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर मामा-मामीच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला चिंतेची किनार लागली. मनाली सर्वसामान्य मुलीसारखी नव्हती. डॉक्टरांच्या मते ती विशेष लक्षणासह मोठी होणार होती. आनंदाची जागा काळजीने घेरली. तिची आई चिंतेने व्याकूळ होऊन गेली. वडिलांपुढे संघर्षाचे चित्र उभे राहिले. शेळके-जाधव परिवारात अस्वस्थता वाढली.डॉक्टर आणि मित्रपरिवाराने समजूत घालत धीर द्यायचा प्रयत्न केला. या संकटातून मार्ग काढत मनालीचे जगणे सुंदर करण्याचा चंग बांधला. आई-वडिलांनी निश्चय केला, तो क्षण केवळ मनालीच्याच नव्हे तर शेळके, जाधव कुटुंबीय, मित्रपरिवार आणि देशातील विशेष जगताला कलाटणी देणारा व अभिमानास्पद ठरला. शाळेतील शिक्षकांनी तिच्यातील गुण हेरले. मनालीला पॉवरलिफ्टिंगमध्ये रस निर्माण होऊ शकतो. हे लक्षात आले अन् गगनाला गवसणी घालण्याचा मनालीचा प्रवास सुरू झाला.

घर आणि शाळेतून तिच्या खेळाला पाठबळ मिळाले. मनालीनेही मेहनत सुरूकेली. राज्य पातळीवरील चमकदार कामगिरीने तिने देशपातळीवर मजल मारली. विशेष मुलांच्या स्पर्धेत राष्ट्रीय तिने एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक मिळविले.अशी मुलंच देशाचं नाव उंचवतील

 

अबुधाबीत जगाची मने जिंकली...अबुधाबी येथे झालेल्या विशेष मुलांच्या आॅलिम्पिकमध्ये मनालीने पाऊल ठेवले आणि अवघ्या जगाची मने जिंकत तिने या आॅलिम्पिकमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्याशिवाय स्काँट, डेडलिफ्ट व कम्बाइन्ड या प्रकारात तीन कांस्यपदके मिळवली. या स्पर्धेतील यशानंतर तिचा सर्वांना अभिमान वाटू लागला. अनेकजण आपल्या मुलांना घेऊन मनालीकडे येत असतात. तिच्यासारखं मुलांना बनविण्याचा संकल्प करतात.

माणूस शरीरानं कधीचअपंग नसतो, तो मनानं अपंग असतो. मनात ताकत असेल कोणतेही यश अवघड नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनाली. सर्वसामान्य मुलांनी कधी निराशा आलीच तर मानलीला आठवावं. तिच्याप्रमाणे कोणताही खेळताही निवडून तिच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करावा.- राजेंद्र चोरगे,बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा.