शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Satara: माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत, प्रशासकीय मान्यता प्राप्त

By नितीन काळेल | Updated: October 6, 2023 18:57 IST

२३ कोटींचा खर्च; तीन वर्षांत सुसज्ज इमारत उभी राहणार 

सातारा : माणपंचायत समितीची इमारत धोकादायक झाली होती. कामकाजासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी जागा मिळवून नवीन इमारतीसाठी प्रयत्न केले. त्यानुसार नवीन इमारत होणार असून २३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे तीन वर्षांत सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे.याबाबत जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी माहिती दिली. यावेळी अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी म्हणाले, माणपंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्याप्रकारे ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. नूतन इमारतीचे सुमारे २३ कोटी रुपये इतके अंदाजपत्रक आहे. ही नवीन प्रशासकीय इमारत दहिवडीतील पशुवैद्यकीय जागेच्या ठिकाणी होणार आहे. इमारत बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ ५ हजार ४६६.९२ चौ.मी. इतके प्रस्तावित करण्यात आलेले आहे.माणमधील या प्रशासकीय इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाणी आणि उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. इमारतीचे काम हाती घेतल्यापासून जास्तीत जास्त तीन वर्षांत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी दिली. 

माण पंचायत समितीची इमारत जीर्ण आणि धोकादायक झालेली होती. कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे नवीन इमारतीसाठी प्रयत्न करण्यात आले. आता नवीन इमारतीस प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली असून सुमारे २३ कोटी रुपये खर्च होणार आहे. काम सुरू झाल्यापासून ही नवीन इमारत तीन वर्षांत पूर्ण होईल. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरman-acमाणpanchayat samitiपंचायत समिती