शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

ठड उल्लू बनाविंग...

By admin | Updated: December 1, 2014 00:20 IST

सुपरहिट

‘कोकणातून थेट मराठवाड्यात पाणी नेऊ पाहणारा आधुनिक भगीरथ भूतलावर दिसू लागलाय,’ अशी दवंडी पिटताच इंद्रदरबारातील सर्वांचेच कान टवकारले गेले. ‘दैवी शक्तीची वल्गना करणारा हा मानव कोण.. मुनीऽऽजी?’ असा तिरकस सवाल देवाधिराजांनी केला. क्षणभर डोळे मिटत नारदमुनींनी वीणेची तारही झंकारली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याकडं पाहत ‘मेरी किस्मत में तू नही शायद, क्यूँ तेरा इंतजार करता हूँ..’ असं विरहगीत आळविणाऱ्या ‘एकनाथ’रावांचा चेहरा मुनींच्या मनचक्षूसमोर तरळला. ‘हे काम खान्देशातल्या एकनाथांचं महाऽऽराज.’ मुनींनी देवाधिराजांना सांगितलं. इंद्रदरबारात काहीजण कुजबुजले, ‘म्हणजे, पाणी पाजणाऱ्या एकनाथांची परंपरा आजही सुरू आहेच म्हणा की.’ तेव्हा नारद गालातल्या गालात हसत उत्तरले, ‘त्या संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं; पण या नेते एकनाथांनी पाण्याचं स्वप्न दाखवून जनतेला गाढव बनवलं!’ हे ऐकून दरबार चमकला. आचार्य अत्रेंच्या भाषेत पुढच्या दहा हजार वर्षांत होणे नाही, असे ‘एक से एक भन्नाट कल्पनाविलासी प्रकल्प’ येत्या पाच वर्षांत कागदावर रंगतील, हेही अनेकांच्या लक्षात आलं... कारण जिथं साधं उरमोडीचं पाणी शेजारच्या माण-खटाव तालुक्यांत पोहोचायला पंचवीस-तीस वर्षे लागली, तिथं खालच्या कोकणातलं पाणी वरच्या मराठवाड्यात कसं शक्य? असा प्रश्न दरबारात उभा ठाकला.तेव्हा देवाधिराजांनी आदेश दिला, ‘मुनीजीऽऽ तत्काळ भूतलावर जा. कोण कुठं कसं जनतेला वेड्यात काढतंय, याचा शोध घ्या अन् त्याची माहिती द्या. मात्र, शासकीय समिती नेमून दहा वर्षांनंतर सादर केल्या जाणाऱ्या अहवालाप्रमाणं नको.. माहिती तत्काळ हवी!’ वीणा वाजवत नारदमुनी भूतलावरील सातारा शहरात अवतरले; मात्र त्यांना आज इथं सारंच कसं-कसं अनोळखी वाटू लागलेलं.. कारण इथली काही ‘खादी’धारी मंडळी चक्क राजपथालगतचा रस्ता झाडत होती. ‘पालिकेतले पूर्वीचे ठेकेदार जसं आता नगरसेवक बनले, तसंच आरोग्य कर्मचारीही नेते बनले की काय,’ असा प्रश्न मुनींच्या डोक्यात तरळून गेला. ते जवळ जाऊन पाहतात तर काय, रस्त्यावर झाडू मारणारे चक्क ‘मेंबर’च होते. रस्त्यावरचा कचरा उचलताना चौकातल्या दोन्ही राजेंच्या फ्लेक्सकडंही ते तिरक्या नजरेनं पाहत होते. मुनींनी हळूच झुटिंगरावांच्या कानात खोचकपणे विचारलं, ‘या मंडळींनी अख्खी पालिका झाडून साफ केली. आता रस्तेही सोडणार नाही वाटतं!’ मात्र, झुटिंगराव नेहमीप्रमाणं वेगळ्याच कामात दंग होते. ‘सर्वोत्कृष्ट साफसुथरा मेहरबान’ पुरस्काराचे ‘मेमेंटो’ तयार करण्यात ते गुंतले होते. बाजूलाच सहकार अन् पत्रकार क्षेत्रातले ‘टू इन वन’ नेते ‘विनोद’रावही कुणाला कोणता पुरस्कार द्यायचा, याचं ‘प्रॉम्टिंग’ करत होते.गोंधळलेल्या मुनींनी ‘पालिकेचा कारभार नेमकं कोण चालवतंय होऽऽ?’ असा सवाल शेजारून चाललेल्या सर्वसामान्य सातारकराला विचारला. ‘गेली दहा वर्षे जे आम्हाला समजलं नाही, ते आता तुम्हाला कसं सांगू?’ असा प्रतिप्रश्न या पेठकरी सातारकरानं केला. ‘सातारच्या साम्राज्यात कधीच प्रश्न विचारायचे नसतात!’ हा भावही बिच्चाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटला होता.एवढ्यात समोरून ‘अकरा-अकरा’ नंबरची काळी गाडी आली. कानाला मोबाईल लावून गाडीतून बाबाराजे खाली उतरले. त्यांच्यासोबत दोन-चार पोलीसही होते. मुनींनी खोदून-खोदून विचारताच एकानं खाकी टोपी नीट करत हळूच सांगितलं, ‘दगडफेकीची अन् टोलनाका जाळण्याची भाषा अलीकडं बाबांच्या तोंडी सारखं येऊ लागलीय. म्हणून एसपी साहेबांनी मुद्दाम आम्हाला त्यांच्यासोबत ठेवलंय.’ मुनी गालातल्या गालात हसले. जेव्हापासून बाबांनी ‘सिंघम’ स्टाईल मिशा ठेवल्या, तेव्हापासूनच त्यांची भाषा आक्रमक बनलीय, हे गुपित फक्त मुनींनीच ओळखलं होतं.बाबा मोबाईलवर बोलता-बोलता ‘थँक्यू पाटीलऽऽजी... थँक्यू. थँक्यू.’ असं काहीबाही म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून ‘आता हे पाटील कोण?’ असा प्रश्न मुनींना पडला. कारण, चमकोशेठ ‘पाटलांचे प्रवीण’ सोडले तर ‘भोसले, चव्हाण अन् कदम’ यांचाच नेहमी बाबाराजेंभोवती गोतावळा. मोठ्या राजेंकडं मात्र कैक पाटलांचीच मांदियाळी; पण या पाटलांशी म्हणजे ‘निशांत अन् नरेंद्र’शी बाबाराजे कशाला बोलतील, हेही मुनींच्या लक्षात आलेलं.मुनींच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून बाबाराजे उत्तरले, ‘पाटील म्हणजे, चंद्रकांत पाटील होऽऽ. त्यांच्यामुळंच सुतावरनं स्वर्ग गाठणं शक्य झालं नां आम्हाला,’ मुनींचं कोडं सुटलं. ते हसले. वर्षानुवर्षे ‘कमळ’वाल्यांच्या सानिध्यात राहून मोठ्या राजेंनाही जे जमलं नाही, ते बाबाराजेंनी चुटकीसरशी करून दाखविलं, हे मुनींच्या लक्षात आलं. त्यांनी दोन्ही हात जोडून बाबाराजेंना नमस्कार केला. मुनी वदले, ‘राजे, खरंच तुम्ही गे्रट.. छान समीकरणं जुळवलीत बघा. दिल्लीत नरेंद्र. मुंबईत देवेंद्र अन् साताऱ्यात शिवेंद्र.’ एवढ्यात मागून आवाज आला, ‘पण विसरू नका होऽऽ राजेंद्र!’ बाबाराजे अन् मुनींनी दचकून मागं बघितलं, तेव्हा ‘पवारांच्या दीपकसोबत चोरगेंचे राजेंद्र’ हसत पुढं आलेले. या दोघांच्याही हातात ‘साताऱ्याची हद्दवाढ अन् त्यानंतरच्या पालिका निवडणुकीतील कमळवाल्यांची व्यूहरचना’ ही चंद्रकांतदादांचीच गुप्त फाईल चमकत होती.सचिन जवळकोटे