गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, राज्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून या आजाराने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढीचे प्रमाणही जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने यामध्ये पुढाकार घेऊन जिल्ह्यातील, विविध तालुक्यांतील, त्या-त्या विभागातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच युवासेना संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे प्राधान्यक्रमाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम हाती घ्यावी. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही मंत्री देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.
कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST