शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By जगदीश कोष्टी | Updated: August 29, 2022 19:26 IST

व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची व्यथा मांडली.

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण करताना स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशा प्रकारे महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा पुन्हा नव्याने तयार करा,’ अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना केल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी सहकुटुंब महाबळेश्वर येथे आले होते. यामध्ये शनिवारी सायंकाळी राजभवन येथील दरबार हॉल येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने त्यांची भेट घेत सुशोभीकरणामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेचे मूळ ब्रिटिशकालीन सौंदर्य नष्ट होण्याचा धोका आहे. या सौंदर्यामुळे महाबळेश्वरच्या अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे; म्हणून या सुशोभीकरणाच्या आराखड्याचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात ॲड. संजय जंगम, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, सतीश ओंबळे, प्रवीण भिलारे, शहरप्रमुख विजय नायडू, माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, अतुल सलागारे, विशाल तोष्णीवाल आदी उपस्थित होते.

या आराखड्याचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी व पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे आराखड्याच्या तरतुदींविषयी माहिती घेतली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘सुशोभीकरण झाले पाहिजे; परंतु ते करीत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन केले गेले पाहिजे. स्थानिकांवर अन्याय होणार असेल तर सुशोभीकरणाचा उपयोग काय? या संपूर्ण सुशोभीकरणाचा आराखडा पुन्हा नव्याने तयार करून सादर करावा.

चार फुटांचे बांधकाम वाचणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाने बाजारपेठेचे सुशोभीकरण सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर करण्यात येणार असल्याने व व्यापाऱ्यांचे चार फुटांचे बांधकाम तुटणार नसल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाबळेश्वरमधून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानEknath Shindeएकनाथ शिंदे