शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पीक क्षेत्रात घट; दीड हजार हेक्टरवरच झाली पेरणी

By नितीन काळेल | Updated: May 13, 2024 19:14 IST

दुष्काळाची झळ; खरीपसाठी पाऊस महत्वाचा 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ असल्याने यावर्षी उन्हाळी पिकाची हवाच गेली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टरवरच पेरणी झाली. ३२.३० टक्के हे प्रमाण आहे. तर आता खरीप हंगामावरच शेतकऱ्यांची भीस्त असून सर्वांचेच मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला.कृषी विभागाकडून सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली. सूर्यफुलाची कोठेही पेरणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

भुईमूग ११२४ तर मका ४१३ हेक्टरवर..जिल्ह्यात उन्हाळ्यात २ हजार ६९९ हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात १ हजार १२४ हेक्टरवर पेर झाली. ४१.६७ टक्के पेरणी प्रमाण आहे. तर मकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ७४ हेक्टर होते. तर पेरणी ४१३ हेक्टरवर झाली. सुमारे २० टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात ३७२ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते. पण, पेरणी १४१ हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत ३२ हेक्टर, पाटण २०६ हेक्टर, कऱ्हाड तालुक्यात ९३, कोरेगाव ६४, खटाव ४५३, माण ४८ हेक्टर, खंडाळा ९३, फलटण १०३ आणि वाई तालुक्यात ३४ हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.

उन्हाळी सोयाबीन १६०० वरुन १४ हेक्टरवर..मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. तसेच दोन वर्षांपूर्वी उन्हाळी सोयाबीन १ हजार ६०० हेक्टरवर घेण्यात आले होते. पण, गेल्या वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने यंदा उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे अंदाजे क्षेत्र ३१ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. प्रत्यक्षात १४ हेक्टरवर पेरणी झाल्याचे समोर आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र