शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा चालणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:37 AM

सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्याचा सर्वाधिक फटका घरेलू काम करणाऱ्या ...

सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्याचा सर्वाधिक फटका घरेलू काम करणाऱ्या महिलांना बसला आहे. अनेक घरांनी मोलकरणींसाठी दरवाजे बंद केल्याने त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालणार, कसा असा प्रश्‍न त्यांच्यापुढे सतावत आहेत.

सातारा शहरात सतराशेहून अधिक घरगुती काम करणाऱ्या महिलांची संख्या आहे. यातील बहुतांश जणी या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या आहेत. त्यांचा आर्थिकस्तर खालावलेला असल्याने त्यांना मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नसतो. शहर परिसरात राहणाऱ्या या महिला परस्परांच्या ओळखीने कामे मिळवितात. वर्षानुवर्षे एकेका घरात काम केल्यानंतर त्या कुटुंबाचा विश्‍वास संपादन केला जातो. या विश्‍वासाच्या भरवश्‍यावरच त्यांचे काम चालते. कोविडकाळात अनेकांच्या नोकरी गेल्याने आणि बहुतांश जणांच्या पगारात कपात झाल्याने त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांना कामावरून कमी केले होते. काही घरांमध्ये सुरू असलेले काम लॉकडाऊन लागल्याने बंद करण्याची वेळ आल्याने या महिला हतबल झाल्या आहेत. आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्यांचाही शासनाने विचार करावा किंवा मग आमच्या दोन वेळच्या अन्नाची सोय करावी, अशी आर्जव या महिला करत आहेत.

चौकट :

एका घरातून मिळतात ५०० रुपये

सातारा शहरात परिसरानुसार धुणे, भांडी, केर, फरशी यांच्या कामाचे दर आहेत. सदरबझार, कुपर कॉलनी आणि उपनगरांमध्ये ही कामे करण्यासाठी प्रत्येकी ७५० रुपये घेतले जातात. शहर परिसरात हा दर पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत असतो. एका घरात चारही कामे करायला महिलांना सरासरी एक तास लागतो. या हिशेबाने या महिला दुपारच्या आतच सरासरी सात ते आठ ठिकाणचं काम करतात. काहीदा स्वयंपाकाची तयारी करून देण्यासाठीही त्यांना जास्तीचे पैसे दिले जातात. पाहुणे आल्यास किंवा जादा काम असल्याचे त्याचे अतिरिक्त पैसे देण्याचा नवा पायंडाही उपनगरांमध्ये पहायला मिळतो.

कोट :

पाच तोंडांचे पोट कसं भरणार?

कोविडमुळे पतीच्या कामावर मर्यादा आल्या. गावाकडे शेतीत काहीच पिकत नाही आणि इकडं नोकरीची अडचण असल्याने माझ्या कामावर घर चालत होतं. आता सगळं बंद झाल्यावर कामंही बंद झालं. काहींनी निम्मा पगार देऊन सगळं नीट झाल्यावर बोलवू, असा निरोप पाठवलाय.

- शांताबाई कांबळे, जानकर वसाहत

पतीची प्रकृती बरी नसल्याने त्यांना कष्टाची कामं करता येत नाहीत, म्हणून मी आठ घरची कामं सुरू केली. कोरोनाकाळात त्यातील दोन कामं सुटली. आता लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आणखी चौघींनी कामावर नका येऊ म्हणून सांगितलं. घराशेजारी असलेली दोन कामाच्या पैशात माझं कुटुंब नाही चालू शकत.

-संगीता बोरकर, मंगळवार पेठ

मुलांसह सासू-सासरे यांची जबाबदारी माझ्यावर आहे. कोरोनापासून मुंबईत पती काम करत असल्या ठिकाणी त्यांचा पगार निम्मा केलाय. त्यामुळे त्यांना पैसे पाठवणं शक्य नाही. इकडं मी सकाळी ७ पासून धुणं, भांडी, केर, फरशी यांची कामे करते. काहींना तर स्वयंपाकातही मदत करून थोडे पैसे कमवते. लॉकडाऊनमुळे आमचं काम बंद करायला तिघींनी सांगितलंय.

-सीमा खंडाईत, ढोणे कॉलनी,

शहरातील मोलकरणींची संख्या : १७८९