वाई : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सर्वसाधारण ३१, इतर मागासवर्ग १४ , अनुसूचित जाती जमाती ५ व अनुसूचित जमाती १ अशा एकूण ५२ ग्रामपंचायतींत महिला सरपंच होणार असल्याचे स्पष्ट झाले.वाई पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात तहसीलदार सदाशिव पडदुणे यांचा उपस्थित वाई तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या संरपचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी दीपा बापट, पंचायत समिती सभापती उमा बुंलुंगे, नायब तहसीलदार दीप्ती रिठे, माजी उपसभापती शंकरराव शिंदे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते़ जाहीर आरक्षण असे : सर्वसाधारण खुला गट - कोंढवली, वयगाव, रेणावळे, उडतारे, बालेघर, किकली, सुरूर, वहागाव, गुंळुंब, निकमवाडी, विरमाडे, गावेदिगर, सुलतानपूर, धोम (पुनर्व.) आसले, वेरुळी, वाघजाईवाडी, व्याजवाडी, ओहळी, मुंगसेवाडी, कांळगवाडी, जोर, उळुंब, एकसर, चांदवडी (पुनर्व.) आसरे, आनपटवाडी, खावली, बावधन, वेलंग. सर्वसाधारण महिला - कणूर, पसरणी, लगडवाडी, व्याहळी (पुनर्व.) , किरुंडे, शेलारवाडी, अमृतवाडी, विठ्ठलवाडी, ओझर्डे, गुंडेवाडी, भोगाव, पांढऱ्याचीवाडी, मोहडेकरवाडी, खडकी, केंजळ, वडवली, गोळेगाव, दरेवाडी, दसवडी, परतवडी, अनवडी, देगाव, मांढरदेव, वाशिवली, गाढवेवाडी, मुगाव, धोम, भिवडी (पुनर्व.), वासोळे, भुर्इंज, इतर मागासवर्गीय महिला- चोराचीवाडी, नांदगणे, सटालेवाडी, जांब, लोहारे, कडेगाव, पांडेवाडी, राऊतवाडी, शेंदूरजणे, बोरीव, दह्याट, पाचवड, बोरगाव, बापर्डी. ओबीसी सर्वसाधारण - कळंबे, कवठे, बेलमाची, खानापूर, आकोशी, वेळे, जाभंळी, परखंदी, अभेपुरी, चिखली, पांडे, चांदक, शिरगाव, अनुसूचित जाती़ सर्वसाधारण - नागेवाडी, यशवंतनगर, मेणवली, चिधंवली. अनुसूचित जाती महिला - मालतपूर, धावडी, बोपेगाव, खोलवडी, शहाबाग. अनुसूचित जमाती - वरखडवाडी. अनुसूचित महिला - कोंढावळे (प्रतिनिधी)
वाई तालुक्यात ५२ ठिकाणी महिलाराज
By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST