शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 05:59 IST

प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते

कुडाळ (सातारा) : जावळी  तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (२२) जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टर भागात सेवा बजावताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाला.  रविवारी  त्याचे पार्थिव  बामणोली तर्फ कुडाळ  येथे आणणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.  

प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. कोरोना काळात त्याने जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियनमध्ये जानेवारीत प्रशिक्षण पूर्ण करून, पहिल्यांदाच जम्मू येथे तो रुजू झाला. अविवाहित प्रथमेशच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमेश यांच्या वीरमरणानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, 3 महिन्यांपूर्वीच ते सैन्यात दाखल झाले होते, अशी माहितीही दिली. 

पहिलेच पोस्टिंग जम्मूतप्राथमिक शिक्षण घेत असताना देशसेवेची आवड त्यांना होती. धाडसी आणि करारी असलेले प्रथमेश आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि परिस्थितीची जाणीव असणारे होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.कुटुंबांचा एकमेव आधारशहीद प्रथमेश हे कुटुंबांचा एकमेव आधार होते. यामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़. सैन्य दलात दाखल झालेले प्रथमेश अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री,, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे.        

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMartyrशहीदSupriya Suleसुप्रिया सुळेJammu Kashmirजम्मू-काश्मीर