शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: उद्या ते मुंबईवरही दावा करतील - पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: November 23, 2022 17:56 IST

गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी

कऱ्हाड : राज्याच्या दिशा बदलण्याचा अधिकार केंद्राच्या सभागृहाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सिमाप्रश्नाबाबत न्यायालयात दावे-प्रतिदावे आहेत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतय, याला महत्व नाही. महाराष्ट्राच्या सिमा निश्चितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा लढा आम्ही ताकदीनिशी लढू, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, अशोकराव पाटील, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, फारुख पटवेकर, इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, झाकीर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र सिमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात न्यायीक लढाई कशी लढायची, याच्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर सिमाभागातील लोकांच्यावर जो अन्याय चालला आहे, त्याबाबत काय करायचे, याच्यावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचे ठरले आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत आहेत, याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, उद्या ते मुंबईवरही दावा करतील. मात्र, ही न्यायीक लढाई  आहे. महाराष्ट्राने याबाबत २००४ साली सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर त्यावर २०१४ मध्ये कर्नाटकने पुन्हा नवा दावा दाखल केले आहे. कर्नाटकने केलेल्या दाव्यामध्ये सिमाप्रश्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्राच्या पार्लमेंटला आहे, असे म्हटले आहे.  त्यामुळे २०१४ च्या दाव्याचा निकाल लागल्याशिवाय मुळच्या दाव्यावर विचार होऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. मात्र, आमची समिती न्यायालयीन लढाई पुर्ण ताकदीने लढेल.गुजरात निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. आप तेथे मोठ्या प्रमाणात उतरला असला तरी तेथे खरी लढत ही काँग्रेस व भाजपमध्येच आहे. भाजपची तेथे सलग २७ वर्ष सत्ता आहे. ती बदलण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

भाजपने खरा शोध घेऊन उत्तरे द्यावीतराहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, इतिहास पुरूषांकडे ऐतिहासीक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्या दोन्ही बाजु तपासल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सावरकरांना माफीवीर असे म्हटले. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी पुरावा मागीतल्यावर त्याचा त्यांनी पुरावाही दिला. आता त्यावर नाहक चर्चा न करता भाजपने खरा शोध घेऊन त्याची उत्तरे द्यावीत... अन् बाबांनी कोपरापासून हाथ जोडले!राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हाथ जोडले. राज्यपाल कोश्यारी हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. त्यांना पुन्हा हिमाचलमध्ये मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी वक्तव्ये केल्यानंतर ते परत पाठवतील, असे त्यांना वाटत असावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची मुख्यमंत्री करणार उद्घाटनेशुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजीत केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण