शहरं
Join us  
Trending Stories
1
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
2
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
3
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
4
"रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
5
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
6
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
7
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
8
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
9
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
10
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
11
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
12
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
14
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
15
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
16
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
17
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
18
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
19
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
20
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा राज्य बार कौन्सिलची निवडणूक: राज्यभरातील वकिलांना मतदार यादींची प्रतीक्षा! 

By प्रमोद सुकरे | Updated: January 14, 2026 12:28 IST

इच्छुकांचा गाठीभेटींना वेग 

प्रमोद सुकरे कराड : गेले दोन अडीच वर्ष रखडलेल्या महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलची निवडणूक नजीच्या काळामध्ये होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक वकील मंडळी आत्तापासूनच कामाला लागली आहेत. कार्यक्षेत्र मोठे असल्याने दोन्ही राज्यात मतदारांना भेटण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. मात्र अजून मतदार यादीच प्रसिद्ध न झाल्याने ती कधी प्रसिद्ध होणार? यांची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील वकिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे बार कौन्सिल कार्यरत राहते. त्यामुळे त्याच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर ५ वर्षांनी याची निवडणूक होते. मात्र कोरोनाच्या महामारी संकटामुळे मुदत संपूनही या बार कौन्सिलची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे लांबलेली निवडणूक आता होणार असल्याचे संकेत मिळत असून अंतर्गत प्रक्रियेला वेग आला आहे.बार कौन्सिल च्या प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर मतदार यादी तयार करताना सन १९९० नंतरच्या वकिलांची सनद व्हेरिफिकेशन केली जाते. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादी मध्ये घेतले जाते. मात्र हीच प्रक्रिया सध्या गेले काही दिवसांपासून उरकत नसल्याचे मतदार यादी रखडलेली दिसते.त्यामुळे इच्छुक  त्याच्या प्रतिक्षेत आहेत.पण सुमारे १ लाख ५० हजार मतदार या मतदार यादित असतील असे जाणकार सांगतात.

यंदा प्रथमच महिलांसाठी ३० टक्के आरक्षण!या निवडणुकीत २५ उमेदवारांची निवड पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेद्वारे केली जाते. यावर्षी प्रथमच ३०% महिलांसाठी आरक्षण ठेवल्याने ८ महिला निवडून दिल्या जाणार आहेत. तर फक्त १७ पुरुषांनाच संचालक मंडळात संधी मिळणार आहे. 

सदस्य संख्या वाढवण्यासाठी न्यायालयात याचिका!महाराष्ट्र व गोवा या २ राज्यातील मतदार वकिलांची संख्या लक्षात घेता या संचालक मंडळाची संख्या २५ वरून ३५ करावी अशा स्वरूपाची एक याचिका पूर्वीच्या बार कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या सुनावणीत काय होतेय याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra-Goa Bar Council Election: Lawyers Await Voter Lists

Web Summary : The Maharashtra-Goa Bar Council election is approaching after delays. Lawyers are preparing, awaiting the voter list, potentially including 1.5 lakh names. This election features 30% reservation for women. A petition seeks to increase council members from 25 to 35.