शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election2019 : गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:44 IST

गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला...

वाई : ‘गड-किल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणं हे आता किळसवाणं झालं आहे. त्याचबरोबर गड-किल्ल्यांवर डान्सबार, बार उघडा असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं,’ असे भावनिक उद्गार माजी खासदार व सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काढले.  वाई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उदयनराजे म्हणाले, ‘गड, किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीके आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केलंय. गड, किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काहींकडून प्रयत्न होत आहे. गड, किल्ले पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी, यासाठी त्याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली. या भूमिकेनुसार गड, किल्ल्यांवर निवासाची सोय, पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी. गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो ते बोललो; मात्र मी जे बोललोच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे.’‘चुकीचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर हे बरोबर नाही. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळून रोजगारनिर्मिती होणार आहे. मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जातो,’ असा आरोपही उदयनराजेंनी या पत्रकार परिषदेत केला.----------------------जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडणार असून, विकासात कुठेही कमी पडणार नाही. विरोधकांनीही जिल्ह्यासाठी काय केले ते सांगावे. निवडणुकीच्या काळात माझ्या चारित्र्यहननाचा काहीजणांकडून कट शिजवला जात आहे.  - उदयनराजे भोसले

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019