शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उच्चांकी मताधिक्य, दिग्गजांचा पराभव करत तीन नवे आमदार

By सचिन काकडे | Updated: November 25, 2024 13:10 IST

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही केला

सचिन काकडेसातारा : सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला भुईसपाट करून महायुतीने आठही विधानसभा मतदारसंघांत आपले वर्चस्व निर्माण केले. महायुतीचे सर्व आमदार या निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले असले तरी या सर्वांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कमी मतदान होऊनही मताधिक्यात आघाडी घेत ‘दमदार आमदार’ असल्याचे सिद्ध केले आहे.सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत यंदा चुरशीने मतदान झाले. सर्वाधिक ७७.६४ टक्के मतदान कोरेगाव तर सर्वात कमी ६३.६३ टक्के मतदान सातारा-जावळी मतदारसंघात झाले. मतदान कमी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते; परंतु शिवेंद्रसिंहराजे यांच्या मताधिक्यावर याचा कोठेही परिणाम न झाल्याचे दिसले. आजवरच्या आमदारकीच्या निवडणुकीत ते सर्वाधिक १ लाख ४२ हजार १२४ मतांनी निवडून आले.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील महायुतीच्या एकाही उमेदवाराला मताधिक्याचा इतका मोठा आकडा गाठता आला नाही. कमी मतदान होऊनही शिवेंद्रसिंहराजे यांच्या पारड्यात १ लाख ७६ हजार ८४० इतकी विक्रमी मते पडली. तसेच उद्धवसेनेचे उमेदवार अमित कदम यांचा त्यांनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मतांनी पराभव केला.

‘आमदारकी’ची माळ पाचव्यांदा गळ्यात..अभयसिंहराजे भोसले यांनी १९७८ ते ९५ या कालावधीत सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजधानीत आमदारकीचा दबदबा कायम ठेवला आहे. २०२४ची निवडणूक जिंकत त्यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही केला.

जिल्ह्याला मिळाले तीन नवे आमदार..कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले तर कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांनी प्रथमच दिग्गजांचा दारुण पराभव करत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली. फलटण मतदारसंघातून अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी विजय मिळवत विधानसभेत पाऊल टाकले. या तीन उमेदवारांच्या रूपाने जिल्ह्याला नवे तीन आमदार मिळाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024