शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

महाबळेश्वरचा पारा घसरला!, यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान

By नितीन काळेल | Updated: November 21, 2022 13:07 IST

थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात उतार येत असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला. सोमवारी तर १०.०४ अंशाची नोंद झाली. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. तर महाबळेश्वरातील सोमवारचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील निचांकी ठरले आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून थंडी जाणवत आहे. पण, मागील आठ दिवसांत थंडीचा जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबरच महाबळेश्वरच्याही किमान तापमानात उतार आला आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे दिवसाही अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. त्याचबरोबर मागील दोन दिवसांत पारा आणखी घसरला. परिणामी हुडहुडीत वाढच झाली आहे.सातारा शहराचे १६ नोव्हेंबरला किमान तापमान १५.०५ अंशावर होते. त्यानंतर उतार येत गेला. रविवारी तर साताऱ्याचा पारा १२.०६ अंशावर होता. हे किमान तापमान या हंगामातील नीचांकी ठरले. मात्र, सोमवारी साताऱ्याचा पारा वाढून १३ अंश नोंद झाला. पण, थंड वारे वाहत आहेत. तर महाबळेश्वरच्या तापमानात उतार आला आहे. रविवारी १०.०६ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, सोमवारी आणखी घसरुन १०.०४ अंशाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील थंडीत वाढ झाली आहे.महाबळेश्वर शहरात नोंद किमान तापमान असे :दि. ११ नोव्हेंबर १३.०६, दि. १२ - १३.०९, दि. १३ - १३.०४, दि. १४ - १६, दि. १५ - १५.०४, दि. १६ - १३.०९, दि. १७ - १२.०८, दि. १८ - १२, दि. १९ - १२.०५, दि. २० - १०.०६ आणि दि. २१ नोव्हेंबर १०.०४

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान