शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात अवतरलं काश्मीर, दुसऱ्या दिवशीही हिमकणांचा नजराना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 19:27 IST

आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली.

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. निसर्गाचा हा अनोखा अविष्कार पर्यटकांना काश्मीरची अनुभूती देऊ लागला आहे.महाबळेश्वरचा निसर्ग जगभरातील पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे वेधून घेतो. येथील डोंगर-दऱ्या, पुरातन मंदिरे, ब्रिटिश कालीन पॉइंट सर्वकाही अद्भूत व विलक्षण असेच आहे. या पर्यटनस्थळाला पर्यटक तिन्ही ऋतूत भेट देतात. मात्र हिवाळा ऋतु सुरू झाल्यानंतर ही सौंदर्यनगरी पर्यटकांनी गजबजून जाते कारण येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ओढ लागते ती हिमकण पाहण्याची. येथील वेण्णा जलाशय परिसरात दरवर्षी दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होते.गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात होणारे चढ-उतार पाहता दवबिंदू गोठण्याची चिन्हे निर्माण झाली होती. बुधवारी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावताच दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू झाली अन् पर्यटकांना हिमकण पहावयास मिळाले.बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचले होते. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या टपांवर, गवतावर व रानफुलांवरही हिमकण पाहावयास मिळाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील वेण्णा जलाशय परिसरात दवबिंदू गोठल्याने हिमकणाचे दर्शन झाले. थंडीच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा दवबिंदू गोठल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. हिमकण गोळा करून फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही.अशी होते दवबिंदू गोठण्याची प्रक्रियाडिसेंबर महिना सुरू झाला की महाबळेश्वरात थंडीची लाट पसरते. प्रामुख्याने डिसेंबर अखेर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. शहराचे किमान तापमान जरी ९ ते १० अंश सेल्सिअस असले तरी वेण्णा जलाशय व परिसराचा पारा पाण्यामुळे ३ ते ४ अंशांवर घसरतो. दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्यासाठी इतके तापमान पुरेसे असते. मात्र तापमान याहीपेक्षा कमी झाल्याने दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान