शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर : ऐन गणेशोत्सवात आगाराचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:31 IST

महाबळेश्वर आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देवेळापत्रक बिघडले अन् शिक्षण कोलमडले !महाबळेश्वरमधील प्रकार: ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची ससेहोलपट

महाबळेश्वर : आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नसल्याने महाबळेश्वरसारख्या दुर्गम व डोंगराळ विभागातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.ऐन गणेशोत्सव कालावधीतच एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. महाबळेश्वर हा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. महाबळेश्वर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. दळणवळणासाठी, बाजारहाटासाठी, शैक्षणिक तसेच शासकीय कामांसाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला महाबळेश्वरला रोज येणे-जाणे असते.

ग्रामीण भागातून महाबळेश्वरला येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एसटी हेच एकमेव माध्यम आहे. सकाळी गावातून सुटणाऱ्या पहिल्या गाडीने महाबळेश्वरला येऊन दिवसभर कामे करून संध्याकाळी मुक्कामाच्या गाडीने घरी परत जायचे.

असा दैनंदिन दिनक्रम येथील नागरिकांचा असतो. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महाबळेश्वर आगाराच्या एसटी बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार व शालेय विद्यार्थ्यांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे.

तासन्तास बसस्थानकावर गाडीची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या तर रोजच ब्रेकडाऊन होत आहेत. असा एकही दिवस जात नाही की कुठलीच गाडी पंक्चर झाली नाही. 

वाहने जुनी झाली आहेत. त्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट मिळत नसल्याने नाईलाजास्तव गाड्या बंद ठेवाव्या लागतात. कमी गाड्यांमध्ये नियोजन करताना अनेक अडचणी येतात. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. नवीन गाड्यांची मागणी करून देखील मिळत नसल्याने जुन्या गाड्या चालवाव्या लागत आहेत.-एन. पी. पतंगे, आगार व्यवस्थापक

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर