लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी संजोग कदम यांना नॅशनल रुलर डेव्हलपमेंट व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी, बेळगाव या संस्थेच्यावतीने ‘आंतरराज्य गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी चिकोडी (बेळगाव) येथे आयोजित एका सोहळ्यात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम, अभियांत्रिक या क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केली जाते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेत केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत नगराध्यक्षा कदम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्काराने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी नगराध्यक्षा कदम यांना ‘लोकमत’ने ‘वुमन आयकॉन्स ऑफ सातारा’ व महाराष्ट्र जनरल फाउंडेशनमार्फत ‘भास्कर भूषण पुरस्कारा’ने गौरविले आहे.
फोटो : माधवी कदम