सातारा : येथील एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सदरबझार येथील एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत ऊर्फ यमनुरी दोडमणी (वय २६) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, संबंधित मुलगी सातारा शहरातील एका पेठेत राहते. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी अकरावीत असून तिचे वय सतरा वर्षे दहा महिने आहे. तिला श्रीकांत दोडमणी (२६, रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबझार, सातारा) याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या आईने दि. १ मे रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर श्रीकांत ऊर्फ यमनुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.