पोतले येथील लकी ड्रॉ कुपन स्पर्धेत एकूण दहा आकर्षक बक्षिसे ठेवली होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षातील कर वसुलीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही सोडत घेण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्याहस्ते ही सोडत काढण्यात आली. त्यामध्ये दिलीप नामदेव जाधव, दिनकर बाबूराव जाधव, विक्रम हनुमंत मोरे यांनी अनुक्रमे शिलाई मशीन, कुलर व टेबल फॅन अशी बक्षिसे पटकावली. यासह विजय पाटील, वाल्मिकी कोळी, संभाजी चव्हाण, पवन पाटील, आनंदा पाटील, महादेव पाखले, इमाम मुल्ला आदी चार ते दहा क्रमांकाचे विजेते ठरले.
सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अविनाश गुरव यांनी बक्षिसांसाठी सहकार्य केले. बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील, आरोग्य विस्ताराधिकारी ए. बी. कोळी, अंकुश नागरे, सदस्य अशोक पाटील, प्रमोद पाटील, अश्लेषा शिंदे, प्रमिला पाटील, विजया सुतार, ग्रामसेवक एस. एस. धाबुगडे, रामचंद्र पाटील, दिलीप पाटील, सदाशिव पवार, प्रकाश पाटील, शरद पाटील, अनिल माळी, राजेंद्र पाटील, अण्णासाहेब काळे, विजय पाटील, अशोक तपासे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.