शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

निष्ठेच फळ मिळालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जावळी-महाबळेश्वर मतदारसंघातून शिंदे हे विजयी झाले. २००४ मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले.

ठळक मुद्देशशिकांत शिंदेंना उमेदवारी; लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या कामाची राष्टÑवादीकडून दखल

स्वप्नील शिंदेसातारा : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री व माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. २०१९च्या विधानसभा व सातारा लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे यांनी राष्टवादीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ह्यजीवाचं रानह्ण केले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्टवादीची पहिली सभा ते प्रचारसांगतेची शरद पवारांची भरपावसातली सभा या दोन्हींचे नियोजन शिंदे यांच्याकडे होते. सातारा जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राष्टवादीचे बाजी मारली मात्र शिंदे यांचा विधानसभेला नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला. मात्र, शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांमधून ह्यकष्टाचं चिज झालं अशी प्रतिक्रिया उमटू लागली. त्यामुळे विधानभवनामध्ये पुन्हा एकादा माथाडी कामगारांचा आवाज घुमणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ह्यजावळीचा वाघह्ण म्हणून ओळख असणारे शशिकांत शिंदे हे माथाडी कामगार संघटनमध्ये काम करीत होते. १९९८ मध्ये झालेल्या जावळी दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात शशिकांत शिंदेंची एन्ट्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जावळी-महाबळेश्वर मतदारसंघातून शिंदे हे विजयी झाले. २००४ मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले.

२००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवित विजय मिळविला. यानंतर त्यांना जलसंपदा मंत्रिपद मिळाले. २०१४ मध्ये त्यांनी कोरेगावमधूनच विजय मिळविला.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. यावेळी राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी शिंदे यांनी परिश्रम घेतले.पवारांच्या भरपावसातल्या सभेने राजकारण बदललेउदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान साता-यातील कल्याण रिसॉर्टमध्ये शरद पवार यांची सभा आयोजित केली होती. यावेळी राज्यभर भाजपची हवा असताना साताºयातील राष्टवादीची पहिली सभा जोरदार झाली.राष्टवादीचे बडे बडे नेते पक्ष सोडत असताना लोक मात्र शरद पवार यांच्याबरोबर आहेत हा संदेश या सभेतून गेला. या सभेचे पूर्ण नियोजन शशिकांत शिंदे यांनी केले होते. यानंतर शरद पवार यांनी भरपावसात केलेल्या सभेने महाराष्ट्राचे राजकारणच बदलले. राष्ट्रवादीने उभारी घेतली. या सभेचेही नियोजन शिंदे यांच्याकडेच होते.विमानतळावरुन आमदारांना आणले होते परतराज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्र्वी राष्टवादीचे काही आमदार मुंबई विमानतळ परिसरात अज्ञातवासात होते. या आमदारांना शोधून परत आणण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केले होते.शरद पवारांचा एकनिष्ठ कार्यकर्ताशरद पवार व राष्टवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. साताºयात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी इतर नेत्याबरोबरच शिंदे यांचा मोठा वाटा आहे. राज्यात युतीचे सरकार असताना शिंदे यांनी राष्टÑवादीची बाजू सातत्याने मांडली. तसेच शिंदे यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. या सर्वामुळे विधानसभेला पराभूत होऊनही शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली.माथाडी कामगारांना मिळाली प्रतिष्ठाजिल्ह्यामधील क-हाड, पाटण, जावळी, महाबळेश्वर व कोरेगाव तालुक्यातील अनेकजण मुंबईमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करतात. शशिकांत शिंदे हे या माथाडी कामगारांचे नेतृत्व करतात. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलची सत्ता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVidhan Parishadविधान परिषद