शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी; वीजगृहातील विसर्गही बंद

By नितीन काळेल | Updated: August 8, 2024 18:38 IST

धरण भरण्यासाठी वेळ लागणार; नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ८७ टीएमसीवर साठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजाला ५६ मिलिमीटरची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस पडला. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, आॅगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले आहे. सध्या पश्चिम भागातच पावसाची उघडझाप सुरू आहे. तर पूर्व माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात उघडीप आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तरीही पश्चिम भागात अजून पावसाची आवश्यकता आहे. तरच धरणे भरणार आहेत.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत काेयनानगर येथे ३० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे ५६ आणि महाबळेश्वरला ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ४ हजार ९६६ मिलिमीटर झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ६९८ आणि कोयनानगर येथे ४ हजार २२० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने धरणातही पाण्याची आवक कमी होत आहे.गुरूवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार १३५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८७.३० टीएमसी झालेला. धरणातील पाणीसाठा ८२.९५ टक्के झाला आहे. तर धरण भरण्यासाठी अजून सुमारे १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच धरणात पाण्याची आवक कमी असल्याने गुरूवारी सकाळपासून पायथा वीजगृहातील २ हजार १०० क्यूसेक विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण