शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोयनेच्या अनेक वाहनांचा खुळखुळा : चालू वाहनांचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:25 IST

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत.

ठळक मुद्देसहा वाहने बंद स्थितीत ; जलसिंचन विभागाकडे कमतरता

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. या विभागातील अधिकारी कर्मचाºयांना वाहनांची आवश्यकता असते. मात्र, कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत.

या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत. विद्युतनिर्मित व पाणीसाठ्यासाठी महाराष्ट्रात कोयना प्रकल्प अग्रेसर आहे. या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाºयांना वाहनांच्या कमतरतेने व नादुरुस्तीमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व इतर ठिकाणी कामानिमित्त जाताना गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने या प्रकल्पाच्या सोयी-सुविधा व देखभालीकडे लक्ष द्यावे लागते.

 

सुमारे १०५.२५ टीएमसी एवढ्या मोठ्या क्षमतेने पाणीसाठा असणारा कोयना प्रकल्प महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र राज्यांसाठी वरदान ठरलेला आहे. परंतु हा प्रकल्प देखभाल दुरुस्ती व सोयी सुविधेअभावी दुर्लक्षित होत आहे. कोयनानगरला धरणाची निर्मिती झाल्यानंतर १९६७ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरलेल्या प्रकल्पाने काही वर्षांत उभारी घेतली. कोयना भाग निसर्गाने बहारलेला आहे. तसा कोयना धरण विविध कार्यालये व जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नगरी व परिसर समृद्ध झाला होता. परंतु गत काही वर्षांपासून कोयना प्रकल्पाला ग्रहण लागले असून, कोयनेतील अनेक शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली तर येथे सुरूअसणारी प्रकल्पातील अनेक कामे ठप्प झाली.

नेहरू गार्डन, पॅगोडा, विश्रामगृह आदींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोयनाप्रकल्पासह कोयना बकाल व ओसाड झाली आहे. या प्रकल्पाने राज्याला खूप दिले. मात्र, त्याबदल्यात या प्रकल्पाला व प्रकल्पग्रस्तांना शासन व प्रशासन पातळीवर दखल घेतली गेली नाही. कोयना जलसिंचन विभागा अंतर्गत सिंचन विभाग, धरण व्यवस्थापन उपविभाग, रस्ते व इमारती उपविभाग, उपकरण उपविभाग, बांधकाम उपविभाग क्रमांक दोन, कोयना प्रकल्प रुग्णालय कोयना, पाटण सिंचन उपविभाग, कोयना सिंचन उपविभाग, कोयना प्रकल्प रुग्णालय अलोरे, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग तारळी सिंचन उपविभाग आदी विभाग आहेत.

या विभागातील अभियंता व अधिकाºयांसाठी कोयना जलसिंचन विभागाकडे सध्या अकरा वाहने उपलब्ध असून, यातील दोनच वाहने सुस्थितीत असून, तीन वाहने वारंवार बंद पडत आहेत तर यातील सहा वाहने गेली कित्येक महिने नादुरुस्त अवस्थेत आहेत. यातील बहुतांशी वाहने वीस-पंचवीस वर्षांची जुनी असल्याने ती दुरुस्त होऊ शकत नाहीत. वाहनांचे सर्व्हे रिपोर्ट केले असून, वरिष्ठ कार्यालयाला माहिती देण्यात आली. बंद वाहनांचे निर्लेखन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोयना प्रकल्पातील वाहनांची कमतरता व बिघाडामुळे संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. तर वाहनचालकांना वाहनांअभावी कामे करावी लागत आहेत....वाहनांवर धुळीचे साम्राज्यकोयना जलसिंचन विभागाकडे सध्या एकूण अकरा वाहने आहेत. यातील कोयनेतील सातपैकी तीन वाहने सुरू आहेत. तर चार बंद अवस्थेत आहेत. अलोरे येथे दोनपैकी एक वाहन सुरू आहे तर सातारा येथील दोनपैकी एक वाहन सुरू आहे. सध्या बंद अवस्थेतील वाहनांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.रुग्णवाहिकांनाही  मिळेना चालककोयना प्रकल्पांतर्गत कोयना व अलोरे येथे रुग्णालय असून, कोयनानगर येथील रुग्णालयाची रुग्णवाहिका कित्येक वर्षांपासून बंद आहे. तर अलोरे येथील रुग्णवाहिका असून, त्यावरील चालक पद रिक्त आहे. त्यामुळे वाहने चालकांअभावी उभी आहेत. या प्रकल्पातील कर्मचारी व स्थानिकांना उपचारासाठी १०८ किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागत आहे.

 

कोयना प्रकल्पाचा विस्तार व सुरक्षिततेचा विचार केल्यास याठिकाणी नवीन आधुनिक सोयीची वाहने असणे गरजेचे आहे. शासन व प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पातील आवश्यक कामासाठी निधीची तरतूद करावी. कोयना जलसिंचन प्रकल्पातील प्रत्येक विभाग व उपविभागाला एक वाहनांची आवश्यकता आहे. मात्र वाहने सुस्थितीत नसल्याने कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे.- वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, कोयना सिंचन प्रकल्प

टॅग्स :Damधरणcarकार