मलकापूर : परप्रांतीय व्यक्तींनी भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू २५ ते ५० टक्के डिस्काउंटमध्ये आगाऊ बुकिंग करून थोड्या दिवसांनी देण्याचे आमिष दाखवले. आमिषाला बळी पडून शेकडो लोकांनी आगाऊ पैसे भरून गुंतवणूक केली होती. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजून लोकांनी संबंधित दुकानाचे कुलूप तोडून 'घावल त्याला पावल' म्हणत वस्तू लंपास केल्या. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमाराची ही घटना घडली.आगाशीवनगर, मलकापूर ता. कराड येथील वृंदावन कॉलनीमध्ये गेल्या महिन्यात परप्रांतीय व्यक्तींनी सोना ट्रेडर्स नावाचे भांडी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान सुरू केले होते. या दुकानात अॅडव्हान्स बुकिंग करून काही मुदतीनंतर वस्तू नेणाऱ्यास पंचवीस टक्के तर काही मुदतीनंतर नेणाऱ्या पन्नास डिस्काउंट देणार अशी पावती गुंतवणूकदाराला देण्यात येत होती. पहिले पंधरा दिवस काही लोकांना वस्तूही मिळाल्या. त्यामुळे वस्तू बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. संबंधित गुंतवणूकदारांनी वस्तूचे बुकिंग करून संपूर्ण रक्कम जमा केली. संबंधित परप्रांतीय लोक पैसे घेऊन पसार झाले असावेत असा गुतंवणूकदारांचा समज झाला. अन् दुकानाचे शटर तोडून वस्तूंची पळवा-पळवी केली. कोणाला काय सापडेल ते घेऊन जात होता. यावेळी काही गुंतवणूकदारांच्यात बाचाबाची ही झाली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी थेट कराड शहर पोलीस ठाणे गाठले. तक्रार घेण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते.
Web Summary : Investors in Malkapur, Satara, looted a shop after a discount scheme turned out to be a fraud. The shop owners, who promised discounts on advance bookings, disappeared with the money. Frustrated investors broke into the shop and stole items.
Web Summary : सतारा के मलकापुर में, एक डिस्काउंट योजना धोखाधड़ी निकलने पर निवेशकों ने एक दुकान लूट ली। दुकान के मालिक, जिन्होंने अग्रिम बुकिंग पर छूट का वादा किया था, पैसे लेकर गायब हो गए। निराश निवेशकों ने दुकान में तोड़फोड़ की और सामान चुरा लिया।