शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

दिसामागून दिस सरले, डांबराने अंग चोरले!-- निवडणूक झाली आता कामाचं बोला

By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST

सातारा शहर : कमानी हौद ते न्यू इंग्लिश स्कूल रस्त्याची व्यथा

सातारा : विकासकामांच्या बाबतीत एखादी मेख मारुन विषय प्रलंबित ठेवण्याचे राजकारण सर्वत्रच पाहायला मिळते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण करताना ठराविक टप्प्यापर्यंत तो पूर्ण करायचा आणि काही अंतर सोडून पुढे तो पूर्ण करायचा, असा प्रकार दुर्मिळच सातारा शहरात कमानी हौद ते रजनी क्लासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत असे घडले आहे, पालिकेने रस्त्याचे काम करताना मधले काही अंतरच डांबरीकरणात वगळले आहे. यामुळे वाहनधारकांना दिसामागून दिस सरले...डांबराने अंग चोरले!, असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनधारक रोज ठणाणा करत होते. पालिकेने विधानसभा निवडणुकीआधी काही रस्त्यांची कामे पूर्ण केली. मात्र, केलेली कामेही आता पंथाला लागण्याच्या मार्गावर आहेत. काही रस्ते पुन्हा खराब झाले आहेत. पालिकेने रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारांची बिले पावसाळ्यानंतर देण्याचा निर्णय घेतला होता, तसेच खराब झालेले रस्ते पालिका तिजोरीला झळ न बसविता कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येणार होती, त्यामुळे आता खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरण कधी होणार?, असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.दरम्यान, कमानी हौद ते रजनी क्लास या अवघ्या १00 मीटरच्या अंतरामध्ये घाईगडबडीने डांबरीकरणाचे काम उरकण्यात आले होते. या रस्त्यावर कमानी हौदापासून ४0 फूट व रजनी क्लासपासून ४0 फूट डांबरीकरण करण्यात आले; परंतु मधला दहा फूट रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याचे काम सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाले. आता उरलेल्या दहा फुटात डांबरीकरण करण्यात कोणती अडचण येऊन ठेपली, असा सवाल नागरिक विचारत आहेत. डांबरीकरण रखडले असल्याने ते होणार आहे की नाही, याचीही शाश्वती नसल्याने वाहनधारक भीतीने गारठले आहेत.रजनी क्लासपासून एखादा वाहनचालक वेगाने कमानी हौदाकडे येतो, त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही तर याठिकाणी तो कोसळतो. पटवर्धन पियूसी सेंटरसमोरच रस्त्याला खड्डा नजरेस पडतो. दोन्ही बाजूने रस्ता उंच आहे आणि या ठिकाणी रस्ता खोलगट आहे. पाऊस झाल्यास येथे पाणी साठून राहत आहे. खोलगट ठिकाणी वाहने घसरत आहेत. पाच महिन्यांपासून जैसे थे स्थिती असून आता पावसाळा संपला आहे, निवडणुकीचा हंगामही संपला आहे, त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यास काय हरकत आहे?, असे नागरिक विचारु लागले आहेत. (प्रतिनिधी)कमानी हौदापासून रजनी क्लासकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात आले असले तरी पटवर्धन गॅरेज समोरच डांबरीकरण केले नसल्याने याठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. रात्रीच्यावेळी गाडी चालविताना हा खोलगट भाग धोकादायक ठरत आहे. ज्यांना रस्त्यांचा अंदाज नाही ते वाहनधारक कोसळत आहेत.- किशोर खलाटेकारणे बास झाली....शहरातील समस्यांबाबत नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर पदाधिकारी व अधिकारी पावसाचे कारण पुढे करत होेते. नंतर विधानसभा निवडणूक आल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले गेले. शहरात बारमाही कामे सुरु असतात. ही कामे एकदाची पूर्ण करुन इतर कामांकडेही पालिकेने बघावे, अशी टीका केली जाते. निवडणुकीमध्ये शहरातील समस्यांबाबत विरोधकांनी विद्यमान आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कारणे बास झाली, असे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे.