शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुनियादारी बघणाऱ्या सातारा पोलिसांची अशीही यारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 15:50 IST

कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या आणि महामार्गावर अपघाताचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांच्या बॅचमेटस्नी आर्थिक मदत केली. दुनियादारी बघणाऱ्या पोलिसांची ही यारी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे.

ठळक मुद्देदुनियादारी बघणाऱ्या सातारा पोलिसांची अशीही यारी!सातारा पोलीस : वारसांसह अपघातग्रस्ताला दिले आर्थिक बळ

सातारा : कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या आणि महामार्गावर अपघाताचा पंचनामा करताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांच्या बॅचमेटस्नी आर्थिक मदत केली. दुनियादारी बघणाऱ्या पोलिसांची ही यारी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे.याबाबत अधिक माहिती अशी, दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला अजित उत्तम टकले हा टपालकामी पोलीस मुख्यालयात आला होता. येथील काम उरकून दहिवडीला परत जात असताना त्याचा पुसेगाव रस्त्यावर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सुमारे एक महिन्यापूर्वी झाला.अजितची २०१४ च्या बॅचचा. त्याची घरची परिस्थिती अगदीच बेताची त्यातच कर्तृत्ववान मुलाचं असं जाणं त्याच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. अजितच्या अंत्यविधी प्रसंगात असतानाच त्यांचा आणखी एक बॅचमेट अपघातात गंभीर जखमी असून, कोमात असल्याची माहिती समोर आली.

सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला अमोल कांबळे बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी वरिष्ठांसह गेला होता. पंचनामा सुरू असताना मागून आलेल्या बसने या दोघांनाही जोरदार धडक दिली. यात वरिष्ठ पोलीस जागीच ठार झाले तर अमोल गंभीर जखमी झाला होता. हा अपघातही काही महिन्यांपूर्वीच झाला होता.आपल्या दोन्ही मित्रांच्या कुटुंबीयांवरील प्रसंगाचा अंदाज घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी त्यांचे सर्व बॅचमेट एकत्र आले. प्रत्येकाने आपापल्या पगारातून रक्कम काढण्याचे ठरविले आणि अवघ्या काही तासांत १ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. ही सर्व रक्कम त्यांनी अजित आणि अमोल यांच्या कुटुंबीयांना दिली.

कोमात असलेला अमोल आता शुद्धीवर आला आहे. मात्र, अपघातामुळे उद्भवलेल्या शारीरिक जखमा भरेपर्यंत त्याच्यावर दवाखान्यातच उपचार सुरू राहणार आहेत. तो अद्यापही खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. बॅचमेटच्या या आवाहनामुळे एकाच्या वारसाला तर दुसऱ्याच्या कुटुंबीयांना आधार मिळाला.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर