लोणंद : सुमारे २२० देशांतील रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सत्तर हजार पावले चालण्याच्या स्पर्धेत जगात लोणंदमधील रोटेरियन प्राजित परदेशी यांचा प्रथम क्रमांक आला आहे. स्पर्धेत सात ते आठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सत्तर हजार पावले चालण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.ही स्पर्धा आॅनलाईन अॅप्सद्वारे जगात एकाच वेळी घेण्यात आली होती. सत्तर हजार पावले चालण्याची ही स्पर्धा प्राजित यांनी आपल्या घरातील हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच ते सकाळी साडेपाचपर्यंत सतत चालून फक्त बारा तासांत पूर्ण करून जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पन्नास हजार पावले कमी वेळेत चालण्यातही त्यांचा जगात प्रथम क्रमांक आला आहे.यापूवीर्ही प्राजित यांच्या नावे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत. प्राजित परदेशी यांनी यापूर्वी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. आळंदी ते पंढरपूर २४५ किलोमीटरचा प्रवास पायी चालत ५८ तासांत पूर्ण केला आहे. तर अष्टविनायक ४७० किलोमीटरचे अंतर एकशे चार तासांत चालत पूर्ण करून लिम्का बुकमध्ये त्यांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी इतरही अनेक शिखरे व किल्ले त्यांनी पादाक्रांत केली आहेत.त्यांच्या यशाबद्दल रोटरीचे अध्यक्ष गोपाळ खंदारे, सचिव प्रवीण चांदवडकर, खजिनदार विश्वनाथ शानभाग, डॉ. विजयकुमार देशमुख, मुस्तफा लोणंदवाला, डॉ. अनिळराजे निंबाळकर, डॉ. गणेश दाणी, भारतातील सर्व रोटरी गव्हर्नर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सत्तर हजार पावले चालण्यात लोणंदचा प्राजित परदेशी आॅनलाईन स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:06 IST
सुमारे २२० देशांतील रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सत्तर हजार पावले चालण्याच्या स्पर्धेत जगात लोणंदमधील रोटेरियन प्राजित परदेशी यांचा प्रथम क्रमांक आला आहे. स्पर्धेत सात ते आठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सत्तर हजार पावले चालण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
सत्तर हजार पावले चालण्यात लोणंदचा प्राजित परदेशी आॅनलाईन स्पर्धेत प्रथम
ठळक मुद्दे सत्तर हजार पावले चालण्यात लोणंदचा प्राजित परदेशी आॅनलाईन स्पर्धेत प्रथमजगभरातील २२० देशांतील आठ हजार स्पर्धकांचा सहभाग