शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदकर करणार नो व्हेईकल डे साजरा!, दर शुक्रवारी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:58 IST

environment Satara- वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी समजून शासनाच्या ह्यमाझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देलोणंदकर करणार नो व्हेईकल डे साजरा!, दर शुक्रवारी रॅलीमाझी वसुंधरा अभियानांतर्गत लोणंद नगरपंचायतीच्यावतीने रॅली

लोणंद : वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी समजून शासनाच्या ह्यमाझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.लोणंद नगर पंचायत व लोणंद सायकलिंग ग्रुपतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोणंद नगरपंचायत पटांगण ते लक्ष्मी रोड ते जुनी पेठ ते गांधी चौक ते नवी पेठ ते बाजारतळ ते राजलक्ष्मी थिएटर ते निंबोडी रस्ता ते सेंट ॲन्स स्कूल व परत त्याच मार्गाने नगरपंचायत पटांगण अशी सहा किलोमीटर सायकल रॅली आयोजित केली होती.

यामध्ये १० वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांपर्यंतच्या महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. रॅलीच्या सुरुवातीला लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके यांनी सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली व यापुढे दर शुक्रवारी लोणंदच्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही वाहन न वापरण्याचा निर्धार केला. दर शुक्रवारी सायकलचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प लोणंदकरांनी केला आहे.लोणंद सायकलिंग ग्रुपचे रोहित निंबाळकर, विनय रावखंडे यांनी या रॅलीचे यशस्वी नियोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन शेळके, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, नगरसेवक लक्ष्मण शेळके, सुभाष घाडगे, पुरुषोत्तम हिंगमिरे, डॉ. नितीन सावंत, राहुल घाडगे, डॉ. स्वाती शहा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागिरकांनी नो व्हेईकल डे साजरा करण्यास सहकार्य करावेमाझी वसुंधरा या योजनेच्या यशस्वीतेसाठी लोणंदमधील सर्व नागरिकांनी किमान दर शुक्रवारी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर न करता पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता नो व्हेईकल डे साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन शेळके व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी केले आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर