शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

केरळच्या मदतीला लोणंदकर धावले सामाजिक संघटना, संस्था : वस्तूरुपी मदत, तासात लाखोंची मदत गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:42 IST

लोणंद : शहरामध्ये अनेक वर्षांपासून शेकडो केरळमधील बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनलोणंदमध्ये सेंट अ‍ॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. लोणंदकरांना या शाळेचा अभिमान आहे. त्यांच्या परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन करताच शेकडो लोणंदकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षांतील सर्वाम मोठी जीवितहानी ...

लोणंद : शहरामध्ये अनेक वर्षांपासून शेकडो केरळमधील बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनलोणंदमध्ये सेंट अ‍ॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. लोणंदकरांना या शाळेचा अभिमान आहे. त्यांच्या परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन करताच शेकडो लोणंदकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षांतील सर्वाम मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरात आतापर्यंत ३५० नागरिकांचा मृत्यू झाला असून, जवळपास सव्वादोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ मध्ये केरळमध्ये अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

केरळकर लोणंदकरांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी होतात. केरळ राज्यावर आलेल्या संकटामुळे लोणंदकरही त्यांच्या मदतीला धावले आहेत. यामध्ये लोणंदमधील रोटरी क्लब, इलरव्हिल क्लब, लोकसेवा प्रतिष्ठान, लोणंद मेडिकल असोसिएशन, नीरा येथील मैत्रय फाउंडेशन, जेजुरी, लोणंद व नीरा येथील व्यापारी बांधव आणि सामाजिक संस्थांनी मिळून लाखो रुपयांची जीवनावश्यक वस्तू, चादरी, धान्य, कपडे, औषधांचा साठा केरळकडे रवाना क रण्यासाठी लोणंद येथील परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टचे फादर अ‍ॅन्टो फुवा, रॉजन जॉन, मिन्स जोसेफ यांच्याकडे देण्यात आला आहे.

सध्या केरळची परिस्थिती ही चिंताजनक अतंत्य गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहे. तसेच आपला संसार ही पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदत केली जात आहे. अशी मदत लोणंदमधील नागरिकांनी केली आहे.लोणंदमध्ये काही तासात लाखो रुपयांची मदत गोळालोणंदमधील प्रसिद्ध कापड विक्रेते यांनी तर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची कपडे व महिला व पुरुषांची अंतरवस्त्रे पाठविली असून, नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे. लोणंद शहरात अनेक दानशूर व्यापारी, डॉक्टर व व्यावसायिक, सामाजिक संस्था असून, संकटाच्या काळात नेहमीच लोणंद शहर पुढे आलेले आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे अवाहन करताच लाखो रुपयांची मदत काही तासांतच गोळा झाली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKerala Floodsकेरळ पूर