कऱ्हाड : ‘लोकमत’च्या कऱ्हाड कार्यालयाचा सहावा वर्धापनदिन शुक्रवार, दि. ९ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त ‘नवी झळाळी कऱ्हाड पाटणची’ हा विशेषांक कऱ्हाड, पाटण तालुक्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानिमित्त नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये सायंकाळी सहाला स्नेहमेळावा आयोजित केला आहे.‘लोकमत’ने सातारा जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारितेतून वेगळा ठसा उमठविला आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतही त्याच धाटणीची पत्रकारिता रुजविली आहे. त्यामुळे वाचकांनी सहा वर्षांत ‘लोकमत’ला प्रथम पसंती दिली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतीत ‘लोकमत’ने कायम जागल्याची भूमिका घेतल्याने येथील सर्वसामान्यांशी स्नेहाचे बंध कायमच घट्ट बांधले गेले आहेत. पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील वाचकांचेही अतूट प्रेम मिळत आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यांनी विविध क्षेत्रांत देदीप्यमान प्रगती केली आहे. दोन्ही तालुक्यांच्या विकासाच्या घोडदौडीचा आढावा घेणारी ‘नवी झळाळी कऱ्हाड-पाटणची’ हा विशेषांक वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानिमित्त सायंकाळी सहाला येथील शाळा क्रमांक तीनमध्ये आयोजित स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आज स्नेहमेळावा
By admin | Updated: January 9, 2015 00:00 IST