शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

लाईव्ह प्राणी दर्शनाचा थरार..! मचाण निसर्ग अनुभव : पुणे, बेंगलोरहून पर्यटकांची हजेरी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:46 IST

किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.

ठळक मुद्देबौद्ध पौर्णिमेचे औचित्य- डॉ. विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन

प्रगती जाधव-पाटील।सातारा : किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.

नाशिक येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख यांच्या आदेशानुसार बौद्ध पौर्णिमेच्यादिवशी सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त मचाण निसर्ग अनुभवाचे आयोजन सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या निसर्ग अनुभवासाठी साताऱ्यासह पुणे, बेंगलोर, मुंबई येथूनही पर्यटक दाखल होणार आहेत.

सह्याद्री व्याघ्र राखीव पश्चिम घाटात पसरलेला आहे. त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांतील राखीव वन क्षेत्रांचा समावेश आहे. हे क्षेत्र सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे दुर्गम व चढ-उताराचे आव्हानात्मक आहे. १८ व १९ मे रोजी या मचाण निसर्ग अनुभव घेण्यासाठी विविध पाणवठ्यांवर तात्पुरत्या स्वरुपाचे मचाण बांधण्यात आले आहे.

प्रत्यक्षात मचाण निसर्ग अनुभवास जाण्यापूर्वी स्वंयसेवक व प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल यांना वनपरिक्षेत्र कार्यालयात मचाण निसर्गानुभवाबाबत मार्गदर्श करण्यात येणार आहे. १८ मे रोजी दुपारी चार वाजता स्वयंसेवक व वन कर्मचारी मचाणावर बसतील तर दुसºया दिवशी सकाळी नऊपर्यंत बाहेर येतील.दरम्यान, निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना येथून आठवण म्हणून काही वस्तू नेण्याची सोयही यंदा पहिल्यादांच करण्यात आली आहे. यांतर्गत सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या वतीने टीशर्ट, टोपी, की चेन, पुस्तके आदी गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.गॅझेटशिवाय स्वत:ला अनुभवण्याची संधीनिसर्गात रमायचं असेल तर त्यात एकरूप व्हावे लागते. अलीकडे आधुनिक गॅझेटमुळे असं एकरूप होणं विस्मृतीत जायला लागलंय. मात्र, या निसर्गानुभवात मोबाईल गॅझेट लांब ठेवून प्राण्यांच्या हालचाली अनुभवण्याचा आनंद घेता येणार आहे. यानिमित्ताने गॅझेटशिवाय स्वत:ला अनुभवण्याची संधीही मिळणार आहे.41  मचाणी   82  स्वयंसेवक   82 वन कर्मचारी. 

 

मचाणावर बसून वन्यप्राणी बघण्याचा अनुभव थरारक आणि चिरकाल स्मृतीत राहणारा आहे. वन्यसंहिता सांभाळून येथे येणारे पर्यटक वन्यजीव पाहण्याचा आनंद घेणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.- डॉ. विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प

 

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर