घात-अपघात किंवा कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत शेकडो लोकांचे जीव वाचविण्यासाठी धावून येणाऱ्या रुग्णवाहिकेलाच चक्क फुलांचा हार अन् लिंबं-बिबे लावलेले साताऱ्यात पाहायला मिळत आहे. हे चित्र पाहिल्यावर अनेकजण डोक्याला हात लावून घेत होते. (छाया : जावेद खान)
००००००
दरवाढीचा फटक
सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर सातत्यावर वाढत असल्याने त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होऊ लागला आहे. भाजी मंडईत व्यापाऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने पालेभाज्यांचे दर या पंधरा दिवसांमध्ये वाढले आहेत. त्यामुळे सातारकरांच्या खिशाला झळ सहन करावी लागत आहे.
००००
सिग्नल यंत्रणा बंदच
सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक, राधिका रस्ता चौकातील सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत होती. ती काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. ही यंत्रणा काही काळ सुरू असतानाच पुन्हा बंद पडली आहे. त्यामुळे पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
०००००
सीसीटीव्हीची गरज
सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकातील प्रतिक्षालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र एकाच वेळी दोन-तीन लाईनमध्ये गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे अनेक भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
००००००
व्यंकटपुऱ्यात स्वच्छता
सातारा : साताऱ्यातील व्यंकटपुरा परिसरात नियमीत स्वच्छता केली जाते. तरीही पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी परिसराची स्वच्छता केली. यामुळे परिसराचा चेहरा मोहराच बदलला आहे. अशाच पद्धतीने यापुढेही मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.