शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:05 IST

Sugar factory Koregaon Satara : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

ठळक मुद्देजरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदेदेऊर येथील ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आव्हान

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडी ला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

 

जरंडेश्वर कारखाना हा जिल्हाची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा,१५ लाख मे टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटी चा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.देऊर ता कोरेगाव येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते.

यावेळी जि. प. कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिग कदम, निलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिग शिंदे, संदीप भोसले, निलेश कदम उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडी ने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडी ने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेऊ नये. यासाठी हे जनजागृती आंदोलन सुरु आहे.

सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावागावात या बाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडी ला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु. ही भूमिका घ्यावी लागेल असे आमदार शिंदे म्हणाले.काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळा ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्या मुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था या ठिकाणी आल्या त्यांना ही या लोकांनी हकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली त्यांनी हा कारखाना ईडी ने चालवावा अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली.

खरं तर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला ही मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धरपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून केला.अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडे बारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्या बरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या उसाला समाधान कारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे. असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोण बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.प्रास्तविक शांताराम दोरके यांनी तर प्रा गुलाबसिग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShashikant Shindeशशिकांत शिंदेSatara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगाव