शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

चला नशा हद्दपार करू! कोरोना व्यसनमुक्तीसाठी इष्टापत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:11 IST

व्यसन सुटावे, असे अनेकांची इच्छा असते; परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यसन सुटत नाही. कोरोनाचा लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली दारूबंदी हा काळ व्यसनापासून अलिप्त होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. - उदय चव्हाण, समुपदेशक, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था,सातारा

ठळक मुद्दे परिवर्तनचा जागरसंडे स्पेशल मुलाखत

सचिन काकडे ।ज्याला व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे, त्या व्यक्तीचा दृढनिश्चय अत्यंत आवश्यक असतो. व्यसनाची कुठलीही वस्तू डोळ्यासमोर आली अथवा तिचा विचार जरी मनात आला आणि ती बाजारात सहजरीत्या उपलब्ध झाली, तरी मनुष्य स्वत:ला रोखू शकतो. मात्र, त्यासाठी मनाचा दृढनिश्चय अत्यावश्यक आहे. इतकी कळ काढलीत तर आणखी काही काळ धीर धरा... खरंच प्रत्येक व्यक्ती जी मनापासून व्यसनमुक्त होण्याची इच्छा बाळगून आहे, ती नक्की यशस्वी होऊ शकते.

प्रश्न : व्यसनमुक्ती संदर्भाने परिवर्तनची भूमिका काय आहे?उत्तर : परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था ही गेली पंचवीस वर्षे साताऱ्यात प्रबोधन, संघर्ष, उपचार यावर डॉ. शैला दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहे. व्यसनाधिन व्यक्तीमुळे कुटुंबाचे हाल होतात ते जाणूनच हे काम चालू केले व आजवर कित्येक कुटुंबे सुखी संसार करतात.

प्रश्न : व्यसन सुटायला किती कालावधी लागतो?उत्तर : व्यसन हा असा आजार आहे की तो पुन:पुन्हा उद्भवतो. त्याला जगात कोठेही औषध नाही. मात्र, मनाचा संयम उपयोगी ठरतो. त्यामुळे ठराविक कालावधीत व्यसन सुटते. हे निश्चित सांगता येत नाही; पण लॉकडाऊनच्या परिस्थितीचा व त्या काळात मनाची स्वीकार क्षमता एकत्र करून मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने संधीचे सोने करू शकता.

प्रश्न : व्यसनमुक्त होण्याची इच्छा असणाऱ्यांनी सध्या काय करावे?उत्तर : कुठलीही व्यसनाची वस्तू आपल्याला मिळणारच नाही, ही परिस्थिती मनाने स्वीकारली आहे. तसेच आपण व्यसन नाही केले तरी आपल्यावर काही फार मोठ-मोठे संकट नाही आलं, त्यामुळे थोडा संयम व शास्त्रीय उपचाराने व्यसन मुक्त होणं शक्य आहे.

व्यसनमुक्तीची हीच खरी संधीव्यसन व्यसनी व व्यसनाधीन या टप्प्यातून व्यसनाचा विचार केला तर सध्या व्यसनाधीन लोकांची अवस्था बिकट झालेली दिसते. याचे कारण दारू वरचे त्यांचे अवलंबित्व वाढले आहे. लॉकडाऊन हा कालावधी आपल्याला बरेच काही शिकण्याची संधी देतोय तसेच ज्यांनी आपल्या व्यसनाच्या इच्छेवर मात केली आहे, त्यांना व्यसनमुक्तीची संधी देत आहे.प्रशासनालाही मोठा हातभार लागेल

कोरोनामुळे अनेकांनी मनात घेतलेली भीती आणि त्यामुळे निर्माण झालेले मानसिक आजार यांच्याशी सामना करण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केलेली आहे. मानसोपचार तज्ज्ञांची मार्गदर्शन मिळत असल्याने अनेकजण भीतीतून बाहेर पडलेत. याच धर्तीवर प्रशासनाने व्यसनमुक्तीसाठी ‘परिवर्तन’ या संस्थेची मदत घेतली तर व्यसनमुक्तीचे कामही या माध्यमातून सहजरीत्या होऊ शकेल.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSocialसामाजिक