शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू, रामराजेंचा रणजितसिंह यांना इशारा 

By नितीन काळेल | Updated: September 7, 2023 17:49 IST

माण पाकव्याप्त काश्मीर आहे का?

सातारा : महायुतीचं काम करायचं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण, यापेक्षा कोण नको आहे यादृष्टीने पावले पडणार आहेत, असा सूचक इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह यांना दिला. तसेच माण विधानसभा मतदारसंघातही तसेच होईल. माण पाकव्याप्त काश्मिर आहे का ? असा सवालही त्यांनी केला.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘१० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्यात येत आहेत. शिरवळला त्यांचे स्वागत होणार असून कऱ्हाडला महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जाणार आहेत. अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मोहळ त्यांच्याजवळ असते. आताही स्वागताला मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी सुरू असून आमदार मकरंद पाटील आणि मी लक्ष ठेवून आहे.माढा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर रामराजे म्हणाले, आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महायुतीत आम्ही आहोत. मतदारसंघाचा उमेदवार ठरला असेल तर माहीत नाही. पण, निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको हे माहीत आहे, असे स्पष्ट करत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना यातून एकप्रकारे इशाराच दिला आहे.

पोलिस बघतील कोण निंबाळकर ते ?फलटण तालुक्यातील नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर रामराजेंनी मला यात गाेवू नका असे स्पष्ट करीत यातील ‘निंबाळकर’ कोण आहेत ते पोलिस बघतील असे सांगितले. तसेच खासदार रणजितसिंह यांच्याबद्दल मी मोठ्या नेतृत्वाबद्दल बाेलू शकत नाही. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. ते बुध्दीमान आहेत, असा टोलाही लगावला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकर